उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीच्या विजयाच्या बऱ्याच बातम्या आणि विश्लेषण समोर येत असताना एका गोष्टीकडे विश्लेषकांचे दुर्लक्ष होताना दिसते आहे, ते म्हणजे पंजाब वर्षानुवर्षाच्या घराणेशाहीच्या कब्जातून मुक्त झाला आहे.Punjab Election Analysis: Is Sukhwinder Singh Badal saying defeat of Captain Saheb … ?? The uprooted leg of the regional dynasty
तेथे भाजप जिंकला नाही याचा आनंद अनेक विश्लेषक साजरा करत आहेत. विरोधी पक्षांना दुसऱ्याच्या घरात मूल झाल्याचा आनंद झाला आहे. त्यामुळे ते आनंदाच्या घुगऱ्या खात आहेत. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब मध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, सुखविंदर सिंग बादल हे सगळे दिग्गज पराभूत झालेत, याचा नेमका अर्थ काय??, हे कोणी सांगताना दिसत नाहीत.
याचा नेमका अर्थ हा आहे की पंजाब घराणेशाहीच्या कब्जातून मुक्त झाले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे वर्षानुवर्षे पतियाळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या पत्नी राजिंदर कौर या आजही तिथे काँग्रेसच्या खासदार आहेत. अमरिंदर सिंग यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. पतियाळातून कॅप्टन साहेबांची घराणेशाही उखडण्याची ही सुरुवात आहे.
सुखविंदर सिंग बादल हे जलालाबाद मधून हरले आहेत. शेतकरी आंदोलनाचा लाभ त्यांना राजकीय दृष्ट्या झाला नाही. गेली 50 वर्षे बादल परिवाराचे पंजाबमध्ये राजकीय वर्चस्व होते. विधिमंडळात अथवा लोकसभेत प्रतिनिधीत्व होते. आज त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. शेतकरी आंदोलन सुरू होण्याआधी त्या मोदी सरकारच्या मंत्री होत्या. पण आता बादल परिवारात पराभवाचा धक्का बसल्यामुळे त्यांच्याही 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीला धक्का बसला आहे. घराणेशाहीचा पंजाब मधला हा पराभव आहे.
पण या घराणेशाहीचा पराभवाचा धोका नेमका पुढे कुठे आहे…??, हे नीट लक्षात घेतले तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग आणि बादल यांची घराणेशाही वर्षानुवर्षे टिकून होती विशिष्ट मतदारसंघ त्यांच्या कब्जात होते. तशीच घराणेशाही महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांच्या रूपाने आजही अस्तित्वात आहे. किंबहुना आज जुगाडू राजकारण करून ते सत्तेवर आहेत. जर पंजाबचा मतदार एकवटून कॅप्टन अमरिंदरसिंग आणि बादल घराण्याची घराणेशाही मतदान यंत्राद्वारे उखडून टाकू शकतो, तर महाराष्ट्रातही ठाकरे – पवारांची घराणेशाही मतदान यंत्राद्वारे उखडून टाकणे मतदाराला अवघड नाही…!!
पंजाब मध्ये आम आदमी पार्टी, महाराष्ट्रात भाजप ताकद सारखीच!!
पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने जसा माहोल तयार केला, जसे संघटन उभे केले तशी महाराष्ट्रात आज भाजपची ताकद तयार झाली आहे. त्यामुळे आणखी संघटनात्मक ताकद निर्माण करून केवळ ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना धक्का देण्यापलिकडे जाऊन ठाकरे आणि पवारांची घराणेशाही त्यांच्या मतदारसंघांतून उखडणे हे देखील भाजपला शक्य होऊ शकेल. हा पोकळ आशावाद नाही. हे पंजाबने आज घालून दिलेले हे उदाहरण आहे…!!
पंजाब मधल्या कॅप्टन अमरिंदरसिंग आणि बादल घराण्यांचे राजकीय कुळ थेट ठाकरे – पवार राजकीय कुळाशी जुळते. या चारही घराण्यांच्या राजकीय वर्चस्व वादाचे मूळ समान आहे. त्यामुळेच जर कॅप्टन अमरिंदरसिंग आणि बादल यांची घराणेशाही पंजाब मध्ये उखडत असेल, तर महाराष्ट्रात देखील ठाकरे आणि पवारांची घराणेशाही उखडणे अवघड नाही, हे या निमित्ताने स्पष्ट दिसू शकते…!!
Punjab Election Analysis: Is Sukhwinder Singh Badal saying defeat of Captain Saheb … ?? The uprooted leg of the regional dynasty
महत्त्वाच्या बातम्या
- UP ELECTION RESULT LIVE : भगवाधारी ..शेतकरी आंदोलन, महागाई-बेरोजगारी सर्वांवर भारी ! ना प्रियंका गांधींचे ‘नाक’ ना मायावतींची ‘जात’ सगळेच सुपर फ्लॉप…फक्त मोदी- योगिराज…
- निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात ; सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब
- आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक सुरू
- घरफाेडी गुन्हेगारांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त