• Download App
    Pune Unlock: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून अनलॉक; पाहा काय सुरु-काय बंद ? Pune Unlock: Important news for Pune residents! Unlock from tomorrow; See what's on-off?

    Pune Unlock: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून अनलॉक ; वाचा काय सुरु-काय बंद ?

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे :मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती पण दुसरीकडे पुण्यात मात्र निर्बंध कठोरच होते. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमतं घेत अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.Pune Unlock: Important news for Pune residents! Unlock from tomorrow; See what’s on-off?

    पुण्यात असणारा लॉकडाऊन अखेर उद्यापासून हटविण्यात येणार आहे. आज अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढाव बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यात असणारे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करत असल्याची माहिती दिली. यावेळी दुकानांसह हॉटेलं सुरु ठेवण्याची वेळ देखील वाढवून देण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पुण्यात आता मॉल देखील सुरु करण्यात येणार आहे. पण मॉलमध्ये ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवेश दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

    पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आज (8 ऑगस्ट) घेतलेल्या निर्णयाने खूप मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

    पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच दुकानांसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही दिलासा देण्यात आला आहे.

     

    काय आहेत नवीन नियम-

     

    >> सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार

    >> हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार

    >> शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी

    >> मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश

    >> पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे.

    >>  दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टीनुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील.

    >>  ग्रामीण भागात मात्र चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.

     

    Pune Unlock: Important news for Pune residents! Unlock from tomorrow; See what’s on-off?

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!