Tuesday, 6 May 2025
  • Download App
    पुण्यात हॉटेल चालकाला एक लाख रुपयांचा दंड ! ; पुन्हा कोरोनाचा नियम मोडल्यास सील ठोकणार Pune Hotel Operator Fined Rs 1 Lakh For Violating Corona Rules

    पुण्यात हॉटेल चालकाला एक लाख रुपयांचा दंड ! ; पुन्हा कोरोनाचा नियम मोडल्यास सील ठोकणार

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनाचे नियम तोडून सुमारे 50 जणांच्या जेवणाची व्यवस्था केल्याप्रकरणी भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. Pune Hotel Operator Fined Rs 1 Lakh For Violating Corona Rules

    महापालिकेने हॉटेल मालकाकडून हा १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नसल्याने, राज्यभरात ३१ मे अखेर पर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्या दरम्यान अनेक गोष्टीवर निर्बंध लादले असून हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा देण्याची मूभा आहे.



     

    मात्र, पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाने नियमांच उल्लंघन केले. हॉटेलमध्ये ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या बाबतची माहिती भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

    नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख रुपयांचा दंड मालकासआकारला आहे. दंडाचा धनादेश घेण्यात आला आहे. भविष्यात नियम तोडल्याने उघड होताच हॉटेल सील केले जाईल, अशी समज देण्यात आली.

    Pune Hotel Operator Fined Rs 1 Lakh For Violating Corona Rules

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!