• Download App
    पुणे विमानतळ प्रवाशांनी गजबजू लागले; विमानांची उड्डाणे २६ वरून ४६ वर पोचली Pune airport was overflowing with passengers; The number of flights increased from 26 to 46

    पुणे विमानतळ प्रवाशांनी गजबजू लागले; विमानांची उड्डाणे २६ वरून ४६ वर पोचली

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनाची दुसरी लाट पुण्यात आता ओसरत असून रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. विशेष म्हणजे पुण्यातून दररोज विमानांची उड्डाणे मे महिन्याच्या तुलनेत २६ वरून ४६ वर आता पोचली आहेत. Pune airport was overflowing with passengers; The number of flights increased from 26 to 46

    आगामी काळात प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा विमान तळावरील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यासाठी काही आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जसा कोरोनाचा संसर्ग कमी होत जाईल. तशीतशी प्रवाशांची संख्या वाढत जाईल. तिकीट खरेदीची प्रक्रिया वाढतच विमानांसाठी आणखी आकाश खुले होईल.

    देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत जात असताना प्रवासी संख्या वाढत असल्याचे आणि विमान उड्डाणाची संख्या वाढत असल्याचे आम्ही पाहत आहोत, असे पुणे विमानतळचे संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या संख्येत काही दिवसात वाढ झाल्याचे ते म्हणाले.

    १७ मे रोजीची चित्र

    १७ मे रोजी १३ विमाने पुण्यात आली. १४ विमानांचे उड्डाण झाले. विविध शहरातून ६५० प्रवासी पुण्यात दाखल झाले आणि ७४६ प्रवासी पुण्याबाहेत गेले.

    १४ जूनचे चित्र

    जून महिन्याच्या सुरुवातीला प्रवाशांची पावले विमानतळाकडे वाळू लागली. १४ जूनला २३०७ प्रवासी पुण्यात आले.१८०६ प्रवासी पुण्याबाहेर गेले.

    परराज्यातून येणाऱ्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट हवाच

    कोरोनापूर्वी ७५ विमाने दिवसाला उतरत होती आणि तेवढीच उड्डाण करत होती. त्या संख्येत घट झाली आहे. ती ४६ च्या आसपास आली आहे. विविध राज्यात कोरोना चाचणीची गरज भासणार नाही तेव्हा विमान आणि प्रवाशांची संख्या आपोआप वाढणार आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशाला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणे बंधनकारक आहे, असे सिंह यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रुग्णाला प्रवासाची परवानगी नाही. तसेच ज्यांच्याकडे सोबत आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नाही. अशा प्रवाशांना परवानगीच देऊ नये, असे एअरलाइन्सला बजावले असल्याचे सिंग यांनी सांगितले.

    Pune airport was overflowing with passengers; The number of flights increased from 26 to 46

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!