Friday, 2 May 2025
  • Download App
    द काश्मीर फाईल्सचा एक तरी सीन, डायलॉग खोटा असल्याचे सिद्ध करा, मी सिनेमा बनवणे सोडून देईन; विवेक अग्निहोत्रींचे आव्हान Prove that one scene, dialogue from The Kashmir Files is fake

    द काश्मीर फाईल्सचा एक तरी सीन, डायलॉग खोटा असल्याचे सिद्ध करा, मी सिनेमा बनवणे सोडून देईन; विवेक अग्निहोत्रींचे आव्हान

    वृत्तसंस्था

    मुंबई : द काश्मीर फाईल्स सिनेमा प्रपोगंडा आणि व्हल्गर फिल्म असल्याची टीका इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख परीक्षक नवाद लॅपीड यांनी केल्यानंतर भारतातले सगळे लिबरल्स त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि पुन्हा मोठा वाद उसळला. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नवाद लॅपीड आणि त्यांच्याभोवती जमलेल्या लिबरल्सना आव्हान दिले आहे. Prove that one scene, dialogue from The Kashmir Files is fake

    द काश्मीर फाईल्स हा सिनेमा तब्बल 700 जणांचा पर्सनल इंटरव्यू आणि सखोल संशोधनानंतर आधारित तयार केला आहे. या सिनेमात एक तरी सीन किंवा एखादा डायलॉग खोटा असल्याचे सिद्ध करा, मी सिनेमा बनविणे सोडून देईन, असे आव्हान विवेक अग्निहोत्री यांनी दिले आहे.



    विवेक अग्निहोत्री यांनी नवाद लॅपीड यांनी व्यक्त केलेल्या मतावर पूर्णपणे असहमती दर्शवली. पण त्याचवेळी केंद्र सरकारलाही घेरले. ज्या केंद्र सरकारच्या अधिकृत चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावर द काश्मीर फाईल्स दाखविला गेला, तेथे काश्मिरी दहशतवाद्यांना आणि फुटीरतावाद्यांना हवा असलेला भारताच्या विरोधातला अजेंडा चालवला गेला, असे टीकास्त्र विवेक अग्निहोत्री यांनी सोडले आहे.

    द काश्मीर फाईल्स या सिनेमाला प्रपोगांडा फिल्म म्हणणे हे माझ्यासाठी नवीन नाही. पण सरकारच्या अधिकृत व्यासपीठावरून फुटीरतावाद्यांचा अजेंडा चालविणे हे मात्र पूर्ण गैर असल्याची टीका त्यांनी केली आहे. ज्या काश्मिरी हिंदूंना कित्येक दशके दहशतीच्या सावटाखाली राहावे लागले, त्यापैकी 700 जणांचे इंटरव्यू घेतले. ते 700 जण प्रपोगंडा करत होते का??, याचे उत्तर इजराइलच्या त्या परीक्षकांनी द्यावे आणि त्याच्या पाठीशी उभे राहिलेल्या भारतातल्या लिबरल्सनी द्यावे, असे आव्हान देखील विवेक अग्निहोत्री यांनी दिले आहे.

    Prove that one scene, dialogue from The Kashmir Files is fake

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही; सुप्रीम कोर्टाने म्हटले- अशा याचिकांमुळे सुरक्षा दलांचे मनोबल कमी होते

    Pahalgam attack: : INS सुरत हाजिरा बंदरावर तैनात; अरबी समुद्रात अँटी शिप-अँटी एयरक्राफ्ट फायरिंगचा सराव

    Baba Ramdev : शरबत प्रकरणी हायकोर्टाने बाबा रामदेव यांना अवमान नोटीस बजावली, न्यायालयात हजर राहावे लागेल

    Icon News Hub