विशेष प्रतिनिधी
जळगाव : पंजाब राज्य दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा मुद्यांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप व ओबीसी आघाडीने आंदोलन केले.
काळी फिती लावून मानवी साखळी करून पंजाब सरकारचा निषेध केला व पंजाब सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, प्रकाश पाटील, सुनील सोनगिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
- चोपड्यात भाजपकडून पंजाब सरकारचा निषेध
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष
- काळी फिती लावून मानवी साखळी करून निषेध
- पंजाब सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी