विशेष प्रतिनिधी
ठाणे : – महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंत पूर्णपणे मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात अंशत: सवलत देण्याचे वचन दिले होते. मात्र, सत्ता मिळविल्यावर पावणेपाच वर्षांपासून वचनाचा विसर पडला.
आता निवडणुकीला तीन महिने राहिल्यानंतर शिवसेनेला जाग आली.घाईघाईने महासभेत करमाफीचा ठराव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात शिवसेनेचेच सरकार आहे. या सरकारने महिनाभरात ठरावाला मंजुरी द्यायला हवी.
अन्यथा, हा शिवसेनेचा `चुनावी जुमला’च ठरेल, हे नक्की. गेल्या ५ वर्षांपासून भाजपाने सतत आंदोलन व इतर माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे शिवसेनेला आज करमाफीचा निर्णय घ्यावाच लागला.
– ठाणे महापालिकेत कर माफीचे जनतेला गाजर
– मालमत्ता करमाफी करणे;शिवसेनेचा `चुनावी जुमला’
– मुदत संपताना कर माफीचे वचन आठविल्याची टीका
– पावणेपाच वर्षांपासून शिवसेना झोपली होती का ?
– निवडणुकीला तीन महिने राहिल्यानंतर शिवसेनेला
– तीन महिने राहिले असताना करमाफीचा ठराव मंजूर
– सरकारने मंजुरी दिल्यास कर माफीचा लाभ मिळणार