वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला ‘बॅटरी ऑपरेटेड मास्क’ असून त्यामध्ये कॉपर फिल्टरचा वापर केला आहे.Production of Total Protection Mask in Mumbai; Protection from Corona And mucormycosis also
कोरोना किंवा अन्य विषाणू , बॅक्टरीया या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणातच नष्ट होतो. त्यामुळे मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार आहोत.
नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्सचे डिन डॉ. नितीन देसाई आणि प्राध्यापक डॉ वृषाली जोशी यांनी हे संशोधन केले. मास्कच्या संशोधनाचे दोन पेटंट सुद्धा मिळाले आहेत. ४० विविध डिझाइनमध्ये ते तयार केले आहेत. नरसी मुनजी विद्यापीठ मास्कची निर्मिती करणार असून मिल्टन फार्मा कंपनी ते बाजारात आणणार आहेत.
‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ कसा कार्य करतो ?
या मास्कमध्ये कॉपर फिल्टर वापरले आहेत. त्याला बॅटरी ऑपरेटरने चार्ज दिला आहे. साधारणपणे ३ वोल्ट पर्यंतचा सप्लाय कॉपर फिल्टरला दिला जातो. चार्ज कॉपर फिल्टरमुळे विषाणू, बॅक्टरीया, फंगस जे या पृष्ठभागावर येतात ते न्यूट्रल होतात, नष्ट होतील. त्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल.’, असे मास्कची निर्मिती करणारे प्राध्यापक, डॉ नितीन देसाई यांनी सांगितलं.
मास्कची बाहेरील बाजू वॉशेबल असून सहा महिन्यांपर्यत याची बॅटरी टिकते. त्यामुळे एक मास्क ६ महिने सहज वापरू शकतो, लॅबमध्ये पूर्ण टेस्टिंग झाले आहे, ७३ तास वापरून सुद्धा या मास्कमध्ये ०%बॅक्टरीयल ग्रोथ मिळाली आहे. मास्कची किंमत बाजारात ८०० ते १२०० रुपयांपर्यंत असणार आहे.
Production of Total Protection Mask in Mumbai; Protection from Corona And mucormycosis also
महत्त्वाच्या बातम्या
- किल्ले रायगड, माथेरानचे दरवाजे तब्बल तीन महिन्यांनी पर्यटकांना खुले ; ई -पासचे बंधन
- नळाने पाणीपुरवठ्यात चारपट वाढ , केंद्रातील मोदी सरकारचे यश; ११७ जिल्ह्यात ‘घर तेथे नळाने पाणी’
- उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार ; मायावतींची घोषणा ; एआयएमआयएमबरोबर आघाडी नाही
- नाशिकचे माजी शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचे निधन; शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
- स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची ओडिशात यशस्वी चाचणी, ४५ किलोमीटरवरचे लक्ष्य भेदले