• Download App
    उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा पाय आणखी खोलात, पक्षातील नेते करताहेत 'आप'मध्ये प्रवेश | The Focus India

    उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा पाय आणखी खोलात, पक्षातील नेते करताहेत ‘आप’मध्ये प्रवेश

    कॉंग्रेसच्या सरचिटणिस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी-वड्रा राज्यात फिरकतही नसल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत. त्याचा फायदा घेऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणातील कॉंग्रेसचे चौथे स्थानही हिरावून घेण्याची रणनिती आम आदमी पक्षाने आखली आहे. यासाठी उत्तर प्रदेश कॉंग्रेसमधील अनेक पक्षांना आपमध्ये प्रवेश दिला जात असून त्यांना महत्वाची पदेही दिली जात आहे.


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : कॉंग्रेसच्या सरचिटणिस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी-वड्रा राज्यात फिरकतही नसल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते वाºयावर आहेत. त्याचा फायदा घेऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणातील कॉंग्रेसचे चौथे स्थानही हिरावून घेण्याची रणनिती आम आदमी पक्षाने आखली आहे. यासाठी उत्तर प्रदेश कॉंग्रेसमधील अनेक पक्षांना आपमध्ये प्रवेश दिला जात असून त्यांना महत्वाची पदेही दिली जात आहे. priyanka gandhi latest news

    उत्तर प्रदेशच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्यानंतर कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. कॉंग्रेसचे हे स्थानही आता डळमळीत होऊ लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रियंका गांधी गेल्या वर्षभरापासून उत्तर प्रदेशच्या कार्यकर्त्यांना भेटलेल्याच नाहीत. priyanka gandhi latest news

    त्यांनी लखनऊमधील पक्ष कार्यालयाला गेल्या वर्षभरापासून भेट दिली नाही. कॉंग्रेसची ही कमजोरी ओळखून आपने रणनिती आखली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपला सध्या काहीही स्थान नाही. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाचे किमान अस्तित्व दिसावे यासाठी आपने कॉंग्रेसच्याच नेत्यांवर गळ टाकायला सुरूवात केली आहे. गेल्या महिन्याभरात ८० हून अधिक स्थानिक नेत्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे.

    त्याचबरोबर कॉंग्रेसच्या लखनऊ शाखेतील २५ जण आपमध्ये गेले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राहूल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्येही आता कार्यकर्त्यांना कॉंग्रेसवर भरोसा राहिलेला नाही. अमेठीतील नेते आणि माजी आमदार नदीम अशरफ जायसी यांना आपने राज्याचे सहप्रमुख बनविले आहे. लखनऊमधील वरिष्ठ नेता सरबजीत मक्कड यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी मीडिया इनचार्ज राजीव बख्शी यांना लखनऊ पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी बनविले आहे.

    कॉंग्रेस आपल्या मुळ उद्दिष्टापासून भरकटली आहे. पक्षामध्ये नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचा संवादच राहिलेला नाही. त्यामुळेच कॉंग्रेसमध्ये भविष्य दिसत नसल्याचे आपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. आपने या नेत्यांना पक्ष संघटनेत महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. कॉंग्रेसमधील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आपमध्ये घेऊन येण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

    priyanka gandhi latest news

    उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय लल्लू यांच्या म्हणण्यानुसार आपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांना पक्षात महत्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी ऐकले नाही.
    आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी खासदार संजय सिंह आठवड्यातून चार-पाच दिवस उत्तर प्रदेशात मुक्काम करत आहेत. दररोज कोठे ना कोठे पक्ष प्रवेश करुन घेत आहेत.

    कॉंग्रेसचे आणखीही अनेक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आपमध्ये येत असलेल्या नेत्यामंध्ये ९५ टक्केंहून अधिक कॉंग्रेसमधूनच येत आहेत. भाजपा, सपा किंवा बसपमधून कोणीही नेता आपमध्ये येण्यास तयार नाही.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??