PMO कार्यालयाने ट्विटरवरुन दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली . भारताने नुकतेच कोरोना लसीचे १०० कोटी डोस दिल्याबद्दलचा लसोत्सव साजरा केला. यानंतर लगेच मोदींनी देशवासियांशी संवाद साधायचं ठरवल्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.Prime Minister Narendra Modi will interact with the people at 10 am today
याआधीही अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला आहे. सध्या लसीकरणात गाठलेला महत्वाचा टप्पा, येणारा दिवाळीचा सण आणि तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती यासारख्या विषयांवर मोदी देशवासियांशी संवाद साधू शकतील अशी शक्यता आहे.
महाराष्ट्र देशात दुसर्या क्रमांकावर-
भारताने शंभर कोटी डोस देण्याची विक्रमी कामगिरी गुरूवारी केली. यात सर्वाधिक डोस देणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात 12,21,40,914 डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 9,32,00,708 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 6,85,12,932, गुजरात 6,76,67,900 आणि पाचव्या क्रमांकांवरील मध्य प्रदेशात 6,72,24,286 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.
Prime Minister Narendra Modi will interact with the people at 10 am today
महत्त्वाच्या बातम्या
- उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही वाटते, संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, चित्रा वाघ यांची टीका
- असाही माहिती अधिकार, बिल्डरकडून 10 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक
- जावयाच्या चार महिन्यांपूर्वी सुरू कंपनीला हसन मुश्रीफ यांनी दिले कंत्राट, किरीट सोमय्या यांचा आरोप
- रशियात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने चिंता, नॉन वर्किंग विकची घोषणा, कामगारांना भर पगारी रजा
- महिला आरक्षणाविरोधात संसदेत हाणामारी करणारे मुलायमसिंग यादव धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का.