• Download App
    Prime Minister Narendra Modi| पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर Prime Minister Narendra Modi | Prime Minister Narendra Modi will visit Pune on March 6 to inaugurate the Pune Metro

    Prime Minister Narendra Modi ! पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. वनाज-गरवारे कॉलेज या पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रोच्या सेवेचे ते उद्घाटन करणार आहेत.Prime Minister Narendra Modi | Prime Minister Narendra Modi will visit Pune on March 6 to inaugurate the Pune Metro

    याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

    यावेळी मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे. यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पारपडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या दौऱ्यात तप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा पुणे दौरा भाजप कार्यकर्त्याना बळ देणारा ठरणार आहे.

    मेट्रोचे काम वेगाने सुरु


    सद्यस्थितीला वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम वेगनवान पातळीवर सुरु आहे. या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती. सद्यस्थितीला मेट्रोचे कोच डेपोमध्ये दाखल झाले आहेत. कामचा वेग वाढवत येत्या पंधरा दिवसात काम मार्गी लावण्याचे आदेश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील डीपीआरच्या कामाला सुरुवात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली.

    3 डब्यांच्या 2 मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. पुणे शहरातील महामेट्रोच्या पहिल्या 33 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे काम वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होत असतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी 113 किलोमीटरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल.

     

    दरम्यान, याआधीही नरेंद्र मोदींचा पुणे दौरा नियोजित होता, परंतु काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता.

    Prime Minister Narendra Modi | Prime Minister Narendra Modi will visit Pune on March 6 to inaugurate the Pune Metro

     

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के