• Download App
    पंतप्रधानांच्या संभाव्य सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण येण्यापूर्वीच काश्मीरमध्ये राजकारण सुरू; बैठकीतील सहभागाबद्दल मेहबूबा मुफ्ती संदिग्ध Prime Minister Narendra Modi likely to chair an all-party meet with leaders of Jammu and Kashmir next week

    पंतप्रधानांच्या संभाव्य सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण येण्यापूर्वीच काश्मीरमध्ये राजकारण सुरू; बैठकीतील सहभागाबद्दल मेहबूबा मुफ्ती संदिग्ध

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू – काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेण्याची शक्यता आहे. अशी बातमी आली. मात्र, या शक्यतेच्या बातमीबरोबरच जम्मू – काश्मीरमध्ये राजकारण सुरू झाले. Prime Minister Narendra Modi likely to chair an all-party meet with leaders of Jammu and Kashmir next week

    या संभाव्य बैठकीच्या निमंत्रणापूर्वीच पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या बैठकीतील सहभागाबद्दल संदिग्धता नोंदविली. मला फोनकॉल आला होता. पण सर्वपक्षीय़ बैठकीचे अधिकृत निमंत्रण आलेले नाही. पीडीपी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधानांनी बोलाविलेल्या संभाव्य बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईन, असे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले आहे.

    काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि आपनी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र या संभाव्य सर्वपक्षीय बैठकीचे स्वागत केले आहे. पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीचे अधिकृत निमंत्रण आले की ते काँग्रेस हायकमांडकडे पाठवू आणि नंतर बैठकीत सहभागी होऊ. जम्मू – काश्मीरच्या जनतेची इच्छा केंद्र सरकारसमोर मांडण्याची ही मोठी संधी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम मीर यांनी सांगितले.

    केंद्राचे अधिकृत निमंत्रण आले आपनी पार्टीचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होऊन जम्मू – काश्मीरच्या जनतेच्या राजकीय अधिकारांचा प्रश्न सर्वपक्षीय बैठकीत मांडेल, असे अपनी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रफी अहमद यांनी सांगितले.

    मात्र, या संभाव्य सर्वपक्षीय बैठकीची नुसती बातमी बाहेर आल्यानंतर राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापला कल जाहीर केल्याने केंद्राला आपली पुढची भूमिका निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे”

    Prime Minister Narendra Modi likely to chair an all-party meet with leaders of Jammu and Kashmir next week

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!