विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेन संकटावर आणि तेथे अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. खारकीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नवीनचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.Prime Minister Narendra Modi held a high-level meeting
तसेच या बैठकीत युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सध्याच्या स्थितीवर आढावा घेत घेण्यात आला. तर अधिकारी तसेच केंद्रीय मंत्र्यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असणारा नवीन जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला आणि रशियन सैनिकांच्या (Russian soldiers) गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर (Russia Ukraine War) पहिल्यांदाच एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले आहे. तर यावर पंतप्रधानांनी (Prime Minister Modi) नवीनच्या कुटुंबियांना फोन करून सहवेदना व्यक्त केल्या आहेत.