प्रादेशिक पक्षांनी पाठवलेला “ट्रोजन हॉर्स” प्रशांत किशोर याला यशस्वीरित्या काँग्रेसमध्ये येण्यापासून रोखल्यानंतर गांधी परिवाराने आपल्या भोवतीचा नेत्यांचा जमावडा पक्का करण्याचे धोरण आखत त्या दृष्टीने पावले देखील लगेच उचलली आहेत. काँग्रेस मध्ये गांधी परिवार “केंद्रीभूत” आहे, असे वक्तव्य करून सलमान खुर्शीद या सारख्या वरिष्ठ नेत्याने त्याचे प्रत्यंतर दिले आहेच, परंतु त्याच बरोबर गांधी परिवाराने हरियाणामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलून जी 23 नेत्यांच्या गटांमध्ये यशस्वीरित्या भेद तयार केला आहे.Prashant Kishor: Stopping the “Trojan Horse” of regional parties
प्रियांका काँग्रेस अध्यक्ष
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याला काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांना अध्यक्षपदी बसवून स्वतःकडे संघटनात्मक फेररचनेचे पूर्ण अधिकार घ्यायचे होते. मात्र प्रशांत किशोर याच्या एकूण सर्व सूचना प्रादेशिक पक्षांना अधिक अनुकूल, तर काँग्रेस पक्षाच्या संघटनेला तसेच गांधी परिवाराला प्रतिकूल अशाच होत्या. त्यामुळे प्रशांत किशोर हा प्रादेशिक नेत्यांनी काँग्रेस प्रवेशासाठी पाठवलेला “ट्रोजन हॉर्स” आहे, असा संशय काँग्रेस नेत्यांमध्ये विशेषत: गांधी परिवारनिष्ठ नेत्यांमध्ये बळावला होता.
हरियाणात प्रदेशाध्यक्ष बदलले
त्यामुळेच योग्यवेळी गांधी परिवाराने खेळी करून प्रशांत किशोरचा काँग्रेस प्रवेश एकीकडे रोखला पण दुसरीकडे काही प्रमाणात सुधारणा करत आपल्या भोवतीचा नेत्यांचा जमावडा देखील पक्का करण्याचे नियोजन केले. यातून जी 23 गटाचे नेते भूपिंदरसिंग हूडा यांचे समर्थक आमदार उदय भान यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवत जी 23 गटामध्ये भेद तयार करण्याचे काम गांधी परिवाराने केले आहे. त्याच वेळी पंजाब मध्ये जो प्रदेश काँग्रेसमध्ये संघर्ष झाला तो हरियाणात काँग्रेस हायकमांडने टाळला आहे. त्यामुळे भूपिंदरसिंग हूडा आता गांधी परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची दाट शक्यता आहे.
सलमान खुर्शीद गांधी परिवाराच्या पाठीशी
एकीकडे हरियाणात अशी खेळी केल्यानंतर दुसरीकडे वरिष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद हे गांधी परिवाराच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत. काँग्रेसच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी गांधी परिवार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. लाखो काँग्रेसजनांना गांधी परिवाराकडून पक्षासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे वक्तव्य करून सलमान खुर्शीद यांनी आपल्या गांधी परिवार निष्ठेचा पुन्हा परिचय करून दिला आहे.
प्रशांत किशोर डाव उधळला
पण यातून गांधी परिवाराने आपल्या भोवतीचा नेत्यांचा जमावडा पक्का करण्याचे धोरण आखले आहे, हेच दिसून येते. प्रशांत किशोर याला काँग्रेस पक्षावरील गांधी परिवाराची पकड ढिली करायची होती. संघटनात्मक पातळीवर बदल करताना गांधी परिवारा इतकेच बाकीच्या नेत्यांना “राजकीय वजन” द्यायचे होते. परंतु, यातून काँग्रेसचे संघटन नेमके किती मजबूत झाले असते याची निश्चित माहिती नाही पण गांधी परिवाराची पक्षावरील पकड मात्र निश्चित सैल झाली असती. त्यामुळे गांधी परिवाराने आणि त्यांच्या भोवतीच्या नेत्यांनी चतुराईने खेळी करत प्रशांत किशोरचा काँग्रेस प्रवेश रोखला. मग भले प्रशांत किशोरने अतिशय गुलाबी भाषेत आपण काँग्रेस प्रवेशाची विनंती फेटाळली, असे ट्विट केले असेल तरी देखील त्याचा हेतू आणि त्या मागचा प्रादेशिक नेत्यांचा हेतू लपून राहिला नव्हता…!!
जी 23 गटात भेद
या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने राजकीय टायमिंग साधत हरियाणा प्रदेशाध्यक्ष बदलणे त्यातून जी 23 गटाला धक्का देणे आणि दुसरीकडे सलमान खुर्शीद यांच्यासारख्या नेत्यांनी गांधी परिवार निष्ठा दाखवणे असे एका बाणात अनेक पक्षी मारले आहेत…!! हेच एकूण घटनाक्रमातून स्पष्ट होते. आत्ता फक्त सलमान खुर्शीद गांधी परिवाराच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. आज दिवसभरात आणि या पुढील काळात असे अनेक समर्थक पुढे आणले जातील. आत्तापर्यंतच्या काँग्रेसच्या आणि विशेषतः गांधी परिवाराच्या राजकीय इतिहासातून तरी हेच घातल्याचे दिसून येते.
Prashant Kishor: Stopping the “Trojan Horse” of regional parties
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक ऑनर किलींग, ब्राम्हण मुलाशी लग्न केले म्हणून दलीत तरुणाने बहिणीला घातल्या गोळ्या
- हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींना रोखण्यासाठी अमेरिका करणार भारताला मदत
- योगी आदित्यनाथांनी करून दाखवलं, उत्तर प्रदेशातील ११ हजारांवर भोंगे टाकले काढून, ३५ हजारांनी केला आवाज कमी
- पंतप्रधानांना जुमला म्हणता, लोकांची माथी भडकवता हेच का तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायालयाने उमर खालीदला सुनावले