- राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली.
विशेष प्रतिनिधी
दमण : महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी दमण येथील फार्मा कंपनीत दरेकर आणि लाड दाखल झाले होते. Prasad Lad Pravin Darekar announces Remdesivir Injection to Maharashtra Government from BJP
राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजपा नेत्यांनी आज (सोमवार)दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचेही दिसून येत आहे.
ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली आहे.
दरम्यान, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी करोना लसींची जितकी गरज असेल, तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे,
Prasad Lad Pravin Darekar announces Remdesivir Injection to Maharashtra Government from BJP