प्रतिनिधी
प्रणव मराठे यांनी एकूण १८ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुभांगी काटे (वय ५९, रा. कोथरूड) असं फिर्यादी महिलेचं नाव आहे. Pranav Marathe of Maratha Jewelers in Pune cheated Rs 5 crore
मराठे ज्वेलर्समार्फत सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा मिळेल असे आमिष नागरिकांना दाखवण्यात आलं होतं. यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले. पण बरेच दिवस होऊनदेखील पैसे मिळाले नाही. याबाबत ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यावर कोणत्याही प्रकाराची माहिती शुभांगी काटे यांनी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
त्यानुसार प्रणव मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास करण्यात आला असता १८ गुंतवणूकदारांची तब्बल ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
या सर्व गुंतवणुकदारांचे पैसे प्रणव यांनी स्वतः फायद्यासाठी वापरल्याचं निष्पन्न झालं असून त्या आधारे प्रणव मराठेला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
- पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक
- गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक
- मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष
- तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रणव मराठेंना बेड्या