वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : काली सिनेमाच्या पोस्टरवर कालीमातेच्या वेशभूषेतील नटीला धूम्रपान करताना दाखविणारे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक लीना मणिमैकली हिच्याविरुद्ध संताप उसळला असून संबंधित सिनेमाचे पोस्टर मागे घेण्याची मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या मुद्द्यावरून तिच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे. Posters showing Kali smoking
या संदर्भात एक ट्विट करून लीना मणिमैकली हिने माझ्याविरुद्ध अटकेची मोहीम चालवण्यापेक्षा द्वेषाविरुद्ध प्रेम अशी मोहीम चालवा असे आवाहन करून पोस्टर मागे घ्यायला नकार दिला आहे. आपण हिंदूंच्या भावना दुखावल्या नसल्याचा दावाही तिने केला असून संबंधित सिनेमा ही फक्त एका रात्रीतली सामान्य कहाणी आहे, असे तिने म्हटले आहे.
पण नुपूर शर्माच्या मुद्द्यावरून देशात जिहादी हिंसाचार माजलेला असताना हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे काली सिनेमाचे पोस्टर जारी करून दिग्दर्शक लीना मणिमैकली हिने सामाजिक वातावरणच दूषित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. या संदर्भात पोलीस कारवाईची अपेक्षा आहे.