प्रतिनिधी
मुंबई – आसाम आणि उत्तर प्रदेशात तिथल्या सरकारांनी लोकसंख्या नियंत्रण धोरण आखले आहे. त्याला देशभरातून बिहार, कर्नाटक यांच्यासारख्या काही राज्यांमध्ये सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे. पण नेमके हेच धोरण राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिकांना टोचले आहे. population control; NCP leader nawab malik makes controversial statement on RSS pracharks
त्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले की दोन अपत्ये ही पॉलिसी 21 वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रात आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता हा दिंडोरा पिटत आहेत. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुले नाहीत. त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा. साक्षी महाराज म्हणतात खूप मूल जन्माला घाला, मग त्यांना कुठली पॉलिसी लावणार?, असे वादग्रस्त वक्तव्यही नवाब मलिक यांनी केले.
यावर अजून संघ किंवा अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि आसामच्या लोकसंख्या धोरणाला पाठिंबा व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की आपल्याला चीनसारखे कठोर निर्बंध लावता येणार नाहीत. पण ठामपणे लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी आपण नक्कीच करू शकतो.
फडणवीस म्हणाले, की लोकसंख्या नियंत्रण कायदा संपूर्ण देशासाठी तयार करण्यात यावा. आपल्याला अगदी चीनप्रमाणे निर्बंध घालायचे नाहीत. पण लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे. आपण लोकशाही देशामध्ये राहतो. आपण वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा कायदा लागू केल्यास नक्कीच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवू शकतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
population control; NCP leader nawab malik makes controversial statement on RSS pracharks
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल