पाकिस्तानची भुकेकंगाली वाढली असून एकेकाळचा घनिष्ठ मित्र असलेल्या सौदी अरेबियाकडून सातत्याने कर्ज चुकविण्याचा लकडा लागत आहे. त्यामुळे चीनकडून कर्ज घेऊन चुकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनच्या ओझ्याखाली आणखी दबून गेला आहे.
विशेष प्रतिनिधी
बीजिंग : पाकिस्तानची भुकेकंगाली वाढली असून एकेकाळचा घनिष्ठ मित्र असलेल्या सौदी अरेबियाकडून सातत्याने कर्ज चुकविण्याचा लकडा लागत आहे. त्यामुळे चीनकडून कर्ज घेऊन चुकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनच्या ओझ्याखाली आणखी दबून गेला आहे. Poor Pakistan under the Chinese burden
पाकिस्तानची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. जागतिक बॅंकेपासून सगळीकडून पाकिस्तानने कर्ज घेतले आहे. सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम वाढत असल्याने सौदीने कर्ज चुकविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे चीनकडून वाट्टेल त्या अटींवर कर्ज घेत आहे. चीनने नुकतेच पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्स म्हणजे ११ हजार कोटी रुपयांची सहाय्यता दिली आहे. या रकमेतून पाकिस्तान कर्ज चुकविणार आहे.
चीननेही ही रक्कम कर्ज म्हणूनच दिली आहे. पाकिस्तानला दिलेल्या कर्जाच्या अटी चीनने अद्याप उघड केल्या नाहीत. परंतु, चीन यासाठी अनेक अटी लादत आहेत. पाकिस्तानने पाकिस्तान-चीन कॉरिडॉर योजनेसाठी यापूर्वी चीनकडून २.७ अब्ज डॉलर्स कर्ज घेतले आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानने चीनला जुन्या कर्जापोटी आत्तापर्यंत २०.५ अब्ज डॉलर्स रुपये व्याज दिले आहे.
Poor Pakistan under the Chinese burden
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१८ मध्ये केलेल्या दौऱ्यानंतर सौदी अरेबियाने ६.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. ते दरवर्षी फेडायचे होते. मात्र, ही अट पाकिस्तान पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानचा खनिज तेलाचा पुरवठाही रोखला होता. त्यामुळे पाकिस्तानला चीनकडून कर्ज घ्यावे लागले आहे.