- संजय राठोड यांच्या क्लीनचिटचा मुद्दा
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तरी न्यायालय किंवा सरकारकडे क्लोजर रिपोर्ट दिला नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. Pooja Chavan commits suicide
पुण्यात पूजा चव्हाण या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. त्याला शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आरोप झाल्यानंतर राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांना या प्रकरणात क्लीनचिट दिल्याच्या आणि त्यांना पुन्हा मंत्री बनविण्यात येत असल्याचा बातम्या आल्या होत्या. परंतु, त्यांना कोणतीही क्लीनचिट दिलेली नाही. आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पोलिस आयुक्तांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर वळसे- पाटील बोलत होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी लवकरच पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी पोलिसांची भरती करण्याचे आश्वासनही दिले. पोलिस आयुक्तालयासाठी नवीन जागा देखील लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत ते म्हणाले की, या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तरी न्यायालय किंवा सरकारकडे क्लोजर रिपोर्ट दिला नाही. त्यामुळे यावर जास्त बोलता येणार नाही. अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्यावे.
चंद्रकांत दादा पाटील याच्याबद्दल बोलताना म्हणाले की, ते जर असे म्हणत असतील की रात्री कुणालाही अटक होऊ शकते तर ही माहिती फक्त त्यांच्याकडे असेल. त्यामुळे ते बोलले असतील. अतिशय सावध भूमिका घेत गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Pooja Chavan commits suicide
- पूजा चव्हाणचे आत्महत्या प्रकरण
- संजय राठोड हेच जबाबदार असल्याचा आरोप
- पूजा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट नाही
- संजय राठोड यांच्या क्लीनचिटचा मुद्दा
- पूजाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरूच
- न्यायालय किंवा सरकारकडे क्लोजर रिपोर्ट नाही
- रात्री कुणालाही अटक ; चंद्रकांत पाटील यांनाच विचारावा अधिक तपशील
- पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी पोलिसांची भरती
- पोलिस आयुक्तालयासाठी नवीन जागा देणार