विशेष प्रतिनिधी
लॉस एंजेलिस – हवेचे प्रदूषण वाढल्याचा अपत्य जन्मावरही परिणाम होत असल्याचा अंदाज कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. Polluted air affects orphan child also
हवेच्या प्रदूषणाचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन २०१९ या वर्षात ५९ लाख बालकांचा नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्म झाल्याचे आणि २८ लाख बालके कमी वजनाची जन्माला आल्याचे संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
संशोधकांनी २०४ देशांमधील माहिती गोळा करून प्रदूषणाच्या परिणामांबाबत अभ्यास केला आहे. प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर परिणाम होऊन नऊ महिने पूर्ण होण्याआधीच अपत्यांचा जन्म होणे आणि त्यांचे वजन कमी असणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणासंदर्भात या समस्यांचा प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे.
गर्भवती महिलांचा प्रदूषणापासून दूर ठेवता आले असते तर २०१९ मध्ये ५९ लाख बालकांचा मातेच्या पोटात नऊ महिने वाढ झाल्यानंतर जन्म झाला असता. तसेच, २८ लाख अपत्यांचे जन्मानंतरचे वजन योग्य राहिले असते, असे या अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही संशोधकांनी सांगितले.
Polluted air affects orphan child also
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला