• Download App
    Political clash in maharashtra and tamilnadu yielding same results losing space for heirs of jaylalitha and balasaheb Thackeray|Political clash in maharashtra and tamilnadu yielding same results losing space for heirs of jaylalitha and balasaheb Thackeray

    बाळासाहेब – जयललिता : सत्तेची गादी लागते मऊमऊ; पण वारसे सांभाळताना नाकीनऊ!!

    इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निमित्ताने शिवसेनेत प्रचंड घमासान माजले असताना तिकडे तामिळनाडूत देखील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये असेच राजकीय घमासान माजले आहे!! दोन्हीकडे राजकीय वारसे जबरदस्त आहेत पण ते सांभाळताना अनुयायांच्या नाकी नऊ आले आहेत!!Political clash in maharashtra and tamilnadu yielding same results losing space for heirs of jaylalitha and balasaheb Thackeray

    महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा कोण पुढे चालवायचा याचे भांडण आता दोघांमध्ये उरले नसून तिघांमध्ये झाले आहे. नेमके तसेच तामिळनाडू मध्ये देखील जयललिता यांचा वारसा अण्णा द्रमुक मध्ये नेमका कोणी चालवायचा याचेही भांडण दोघांमध्ये उरले नसून तिघांमध्ये सुरू झाले आहे. महाराष्ट्रात बाळासाहेबांचा वारसा आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे, पुतणे राज ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यात त्रिभागला गेला आहे, तर तामिळनाडूतही जयललिता यांचा राजकीय वारसा माजी मुख्यमंत्री इडापड्डी पलानिस्वामी, माजी उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात त्रिभागला गेला आहे.



    पलानिस्वामी, पनीरसेल्वम, शशिकला

    तामिळनाडू सत्ता होती तोपर्यंत इडापड्डी पलानिस्वामी आणि ओ पनीरसेल्वम हे एकत्र होते. पण विधानसभा निवडणुकीत सत्ता गेल्यानंतर आता तेच राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आणि त्या दोघांच्या भांडणांमध्ये आता जयललितांच्या एकेकाळच्या जिवलग मैत्रीण शशिकला देखील उतरल्या आहेत. किंबहुना आत्तापर्यंत साईड-इफेक्ट झालेल्या शशिकला यांना त्या दोघांच्या भांडणात शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे.

     लाठ्या काठ्या जोरदार भांडण

    पनीर सेल्वम यांच्या समर्थकांनी परवाच अण्णा द्रमुकच्या कार्यालयात घुसून त्यांनी पलानिस्वामी यांची पोस्टर फाडून टाकली. दोन्ही गट एकमेकांसमोर लाठ्या काठ्या घेऊन उभे राहिले. जोरदार भांडणे झाली. त्यानंतर शशिकला यांनी अण्णा द्रमुक पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू करून दोन मोठ्या रॅली काढल्या. जयललितांचा खरा राजकीय वारसा आपणच चालवणार आहोत. आपण दोन्ही भांडणाऱ्या गटांना एकत्र आणून तामिळनाडूत पुन्हा जयललितांच्या अण्णाद्रमुकाची सत्ता आणू असा दावा शशिकला यांनी केला आहे.

    एम. के. स्टालिन सत्ता मजबूत

    अण्णा द्रमुक पक्ष एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केला. तो जयललिता यांनी वाढवला पण सत्तेची फळे चाखत असताना त्यामध्ये तीन शकले झाली आणि आता ही तीन शकलेच एकमेकांविरुद्ध जोरदार घमासान करत करुणानिधी यांचे वारस मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची सत्ता बळकट करायला आतून आणि बाहेरून मदत करत आहेत. आधीच तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकने सत्ता गमावली आहे. एम. के. स्टालिन यांची सत्ता आणि पकड मजबूत होत आहे आणि ती मजबूत होत असतानाच जयललिता यांच्या अण्णा द्रमुक मध्ये विभाजन होऊन जयललितांचा वारसा अधिकाधिक दुबळा होत चालला आहे.

     राष्ट्रवादी, द्रमुक आणि भाजप

    महाराष्ट्रात देखील उद्धव, राज आणि शिंदे हे त्रिभाजन बाळासाहेबांचाच वारसा त्रिभाजित करत आहेत. जसे तामिळनाडूतल्या जयललितांच्या वारशाच्या त्रिभाजन आतून एमके स्टालिन मजबूत होत आहेत तसे महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या वर्षाच्या त्रिभाजन आतून राष्ट्रवादी मजबूत होत आहे… पण भाजप त्याचा सर्वाधिक लाभार्थी ठरताना दिसत आहे!!

     तामिळनाडू भाजपची वाटचाल मजबूतीकडे

    भाजप महाराष्ट्रात मजबूत होत आहेच. पण तामिळनाडूत देखील भाजपची वाटचाल देखील प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची पोलिटिकल स्पेस तयार करून सुरुवातीला विरोधी पक्ष होण्याची आणि नंतर हळूहळू सत्तेकडे वाटचाल करण्याची होताना दिसत आहे. अण्णा द्रमुक मधले त्रिभाजन यासाठी भाजपला वाट अधिक मोकळी करताना दिसत आहे.

    Political clash in maharashtra and tamilnadu yielding same results losing space for heirs of jaylalitha and balasaheb Thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!