Monday, 5 May 2025
  • Download App
    ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या ‘फ्री पास’साठी पोलिसांची धमकी, अमोल कोल्हेंनी थेट मंचावरूनच व्यक्त केली नाराजी, म्हणाले... Police threat for free pass of Shivputra Sambhaji mahanatya Amol Kolhe expressed his displeasure directly from the stage

    ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या ‘फ्री पास’साठी पोलिसांची धमकी, अमोल कोल्हेंनी थेट मंचावरूनच व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे विनंती,  जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी-चिंचवड : अभिनेते  अमोल कोल्हे हे छत्रपती  संभाजी राजे यांच्या जीवनावरील ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे राज्यभर अनेक ठिकाणी प्रयोग करत आहेत. दरम्यान,  त्यांना  पिंपरी-चिंचवडमध्ये एक वाईट अनुभव आला. जो त्यांनी सोशल मीडियाद्वारे आणि थेट मंचावरूनच सर्वांसोबत शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. Police threat for free pass of Shivputra Sambhaji mahanatya Amol Kolhe expressed his displeasure directly from the stage

    या  महानाट्याचे फ्री पास मिळवण्यासाठी पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचा अमोल कोल्हे यांनी उघडपणे  आरोप केला आहे. शिवाय, जाहीरपणे मंचावरूनच नाराजी व्यक्त करत,  गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याचीही विनंती केली आहे.

    या प्रकारामुळे नाराज झालेले अमोल कोल्हे महानाट्याच्या प्रयोगादरम्यान मंचावरूनच जाहीरपणे म्हणाले की, ‘’जय शिवराय! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो आणि प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापार्यंत छत्रपती संभाजीनगर,  नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह हे महानाट्य तिकीट काढून दाखवलं आहे. मात्र एक खेदाची गोष्ट  तुमच्याशी बोलण्यासाठी इथे मी आलो आहे. आज पिंपरी-चिंचवड शहरात मात्र अत्यंत खेदजनक असा अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही, कारण विरोध व्यक्तीला नाही. विरोध प्रवृत्तीला आहे आणि ही प्रवृत्ती फ्री पास मागण्याची प्रवृत्ती आहे. याला माझा विरोध आहे.’’

    याशिवाय, ‘’अगदी शेवटचं  ३०० रुपये  तिकीट काढून आपल्या लेकरांना छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास दाखवायला आलेल्या, प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो.  मात्र ही जी फ्री पास मागण्याची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तील मी एवढच सांगेन की इथे बसलेले हे सगळेजण हे कर देतात, ज्यामधून आपल्याला महिन्याचा पगार येतो आणि छत्रपतींचा इतिहास बघण्याठी तुम्ही फ्री पास मागतात. पास दिला नाही तर कसं नाटक होतं, ते बघतो, हे जर आपण सांगत असाल. तर माझी हात जोडून विनंती आहे की,  पोलीस दलाची जी उज्ज्वल परंपरा आहे. २६/११ च्या वेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं आहे, कोविडच्या काळात ते पोलीस दल प्राणाची पर्वा न करता रस्त्यावर होतं. केवळ अशा शुल्लक स्वार्थापायी त्या पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेला गालबोट लावू नका. अशी  माझी कळकळीची विनंती  त्या पोलीस बांधवांना आहे, जे  इथे बसलेले आहेत. मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत  नाही.’’ असं अमोल कोल्हे म्हणाले.

    याचबरोबर, ‘’या मंचावरून मी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ही गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या पद्धतीने जर एखादा पोलस बांधव फ्री पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो, हे बघतोच हे जर बोलत  असेल तर गृहमंत्र्यांनी त्यांना ही समज द्यावी, अंगावर आलेली वर्दी ही केवळ अधिकाराची नाही. ही त्यापेक्षा जास्त जबाबदारीची  आहे, याचं त्यांनी भान ठेवावं.  ही माझी हात जोडून विंनंती आहे.’’ अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त  केली.

    Police threat for free pass of Shivputra Sambhaji mahanatya Amol Kolhe expressed his displeasure directly from the stage

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    Icon News Hub