- दिल्लीच्या वेशीवरील श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; मराठा मोर्चाच्या आंदोलनाला मात्र विरोध
- ठाकरे – पवार सरकारची दुटप्पी भूमिका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोन दिवसांत उरकायच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन छेडू नये यासाठी बसवरचा भगवा काढून टाकण्याची हिणकस कारवाई ठाकरे – पवार सरकारने केली आहे.
Police action on Maratha Morcha by removing saffron from bus
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना ठाकरे – पवार सरकार मुंबईच्या वेशीवरच पोलिसांकडून सोमवारी रोखते आहे. आज सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. बसवरचा भगवा झेंडा काढल्याच्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत असून दिल्लीच्या वेशीवरच्या पंजाबी श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा मोर्चाच्या आंदोलकांवर कारवाई असा ठाकरे – पवार सरकारचा खाक्या दिसतो आहे. याचा मराठा मोर्चाच्या संयोजकांनी आणि अन्य राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.
बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती”.
भगवा काढून बस रवाना केली…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 15, 2020
धक्कादायक!
हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…
उद्धव जी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल!
काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती.
महाराष्ट्र याचं उत्तर नक्कीच देतील !@OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/wn8Dm6UL4C
मराठा आरक्षणावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. यासाठी काही संघटनांनी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवलं होतं. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या संघटनांकडून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता होती.
Police action on Maratha Morcha by removing saffron from bus
यामुळे सोमवारी सकाळपासून ठाणे, मुलुंड आणि मानखुर्द टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांना थांबवून पोलीस या वाहनांची तपासणी करत होते. या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागला.