वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एखादं सरकारी काम अडले असेल खूप उशीर होत असेल तर नागरिक थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. pmo complaint help online office of prime minister to address online complaint
अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. वेळ, पैसा खर्च करून देखील काम होत नाही.केंद्र सरकारद्वारे अनेक योजना सुरू आहेत. मात्र योजनांचा लाभ मिळण्यास खूप उशीर होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण सामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. अवघ्या काही मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अशी करा तक्रार
- सर्वप्रथम पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाईट https://www.pmindia.gov.in/en वर जा.
- येथे एक ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल तिथे Interact with PM मधील Write to the Prime Minister वर क्लिक करा
- येथून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार ऑनलाईन पाठवू शकता
- आता तुमच्यासमोर एक CPGRAMS पेज ओपन होईल
- या पेजवर तक्रारी दाखल करता येतात
- तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल
- तक्रारीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा
- विचारलेली सर्व माहिती भरा
- तुमची तक्रार नोंदवली जाईल
ऑनलाईनबरोबर तुम्ही ऑफलाईन तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011. या पत्त्यावर पत्र पाठवता येईल. फॅक्सद्वारे तक्रारही नोंदवता येते. त्यासाठी 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर फॅक्स पाठवता येईल.
pmo complaint help online office of prime minister to address online complaint
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
- सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
- Bengal Post Poll Violence : सीबीआयने 9 केसेस नोंदवल्या; लवकरच तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांच्या चौकशीची शक्यता
- All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, 565 जणांना आणले
- पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी