दिवाळी पाडव्याला दरवर्षी त्र्यंबकेश्वर मंदिरावर रेशमी भगवा ध्वज कळसावर चढवण्याची परंपरा आहे. ती शुक्रवारी (ता. ५ ) पाळण्यात आली. PM Narendra Modi’s speech at Kedarnath impressed devotees at Tryambakeshwar\
प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर : प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात केदारनाथ येथील सोहळ्याचे अध्यात्मिक अर्थाने केदारनाथाचे दर्शन घडले.केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले.
केदारनाथ येथील कार्यक्रमाचे प्रक्षेपण त्र्यंबकेश्वरला दाखवण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने श्रोते भारावून गेले.
सन 2013 मध्ये महापूरात केदारनाथचे मोठे नुकसान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या विकास कामांचे लोकार्पण केदारनाथला मोठे वैभव मिळवून देईल, असा विश्वास राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, तुषार भोसले, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत धनंजय गिरी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
पेट्रोलचे दर केंद्र सरकारने कमी केले आहे. अबकारी कर कमी झाला. राज्य सरकारचा ही इंधन दरांशी संबंध असतो. ठाकरे-पवार सरकारने ठरवले तर पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी करता येतील असे फडणवीस यांनी सांगितले. देशातील भाजपा शासीत राज्यांनी मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल स्वस्त केल्यानंतर लगेच राज्यांचे करही कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप पेट्रोल-डिझेल वरील कर कमी केलेले नाहीत.
PM Narendra Modi’s speech at Kedarnath impressed devotees at Tryambakeshwar
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न