विनायक ढेरे
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा जो संपूर्ण मेकओवर करीत आहेत, तो Symbolism, Social engineering; या शब्दांच्या पलिकडचा मंत्रिमंडळ विस्तार मानला पाहिजे. कारण भारताच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित आणि पिछड्या समाजाच्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळताना दिसत आहे. PM Modi New Tean; beyaond Symbolism, Social engineering
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 12 मंत्री मागास प्रवर्गातील असतील. यातील प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या एससी समुदायातील असेल. 12 मंत्र्यांपैकी दोन मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8 मंत्री अनुसूचित जमातीचे असणार आहेत.
27 मंत्री ओबीसी समाजातील असतील. यापैकी 19 हे अतिमागास प्रवर्गातील जसे की यादव, कुर्मी, जाटव, शिंपी, कोळी आणि वोक्कलिगा या समुदायातील असतील. ओबीसी समुदायातील 5 मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. 5 मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील असतील. यामध्ये 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध आणि 1 ख्रिश्चन समाजातील असतील.
याशिवाय ब्राह्मण, भूमिहार, कायस्थ, क्षत्रिय, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील 29 मंत्री असतील.
याचा अर्थ पूर्वी जसे केंद्रीय मंत्रिमंडळात दलित किंवा पिछड्या समाजाच्या मंत्र्यांना मोजके स्थान असायचे आणि त्यांची खाती देखील समाज कल्याण, मजूर, आदिवासी कल्याण किंवा तत्सम असायची. ही खाती महत्त्वाची नाहीत, असे नाही. पण काँग्रेसच्या राजवटीत मुद्दाम दलित आणि पिछड्या समाजाच्या नेत्यांकडे ही खाती Symbolism अर्थात प्रतिकात्मकता म्हणून सोपविली जायची. किंबहुना जेवढी अशी खाती असायची तेवढेच त्या समाजाचे मंत्री घेऊन दलित – पिछड्यांचे राजकारण खेळले जायचे.
पण मोदी कॅबिनेट – २ मध्ये २७ – १२ – १९ एवढ्या मोठ्या संख्येने ओबीसी, मागास आणि अतिमागास प्रवर्गाचे मंत्री असणार आहेत, तेव्हा हा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल फक्त Symbolism, Social engineering या शब्दांच्या मर्यादेत बसलेला राहात नाही. कारण या मंत्र्यांना देण्यात येणारी खाती वर उल्लेख केल्यानुसार फक्त मजूर, समाज कल्याण, आदिवासी कल्याण किंवा कुटुंब कल्याण यांच्या पुरती मर्यादित राहणार नाहीत. तर पर्यावरण, माहिती प्रसारण, माहिती तंत्रज्ञान, कायदा, सहकारिता आदी राजकीय महत्त्वाची खाती देखील त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकतात.
तर या सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या राजकीय महत्त्वानुसार आणि व्यावसायिक कौशल्यानुसार खाती दिली जातील, हे उघड आहे. या अर्थाने मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेररचना Symbolism, Social engineering या दोन शब्दांच्या पलिकडची आहे असे मानण्यास वाव आहे.