• Download App
    PM MODI ! शेतकरी  सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे चार मोठे निर्णय ; वाचा सविस्तर PM MODI! Four major decisions of Modi government to provide relief to farmers; Read detailed

    PM MODI ! शेतकरी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे चार मोठे निर्णय ; वाचा सविस्तर

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे 4 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

    • केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, धान्याचा एमएसपी 72 रुपये प्रतिक्विंटलने वाढवला असून आता तो प्रति क्विंटल 1940 रुपये झाला आहे.

    •  यासह खरीप हंगामातील इतर पिकांच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे. PM MODI! Four major decisions of Modi government to provide relief to farmers; Read detailed

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरिप हंगांमाच्या पार्श्वभूमीवर किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली तर दुसरीकडे रेल्वेला 4 जी स्पेक्ट्रम वापरण्यास मंजुरी देण्यात आलीये.तेलंगाणातील रासायनिक खते निर्मिती कंपनीला अनुदान देण्याचा निर्णय देखील  झाला आहे.  PM MODI! Four major decisions of Modi government to provide relief to farmers; Read detailed

    धान्य एमएसपी वाढ-

    धान्याचा एमएसपी 72 रुपये प्रतिक्विंटलने वाढवला असून आता तो प्रति क्विंटल 1940 रुपये झाला आहे.

    बाजरीचा एमएसपी प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये झाला  आहे  .

    खरीप एमएसपी 452 रुपयांपर्यंत वाढवली-

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे.

    मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे. भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

    विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी जाहीर करण्यात आली आहे. सर्वात कमी एमएसपी मका पिकाची वाढली आहे. मका पिकाची एमएसपी 1850 वरुन 1870 वर गेली आहे.

    4G स्पेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी

    केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत रेल्वे संदेशवहनासाठी 2G स्पेक्ट्रम वापरत होते. आता रेल्वेला 700 मेगा हर्टझ बँड दिला जाईल. रेल्वेला या निर्णयाचा फायदा होईल आणि सुरक्षेवर फरक पडेल.

    अत्याधुनिक स्पेक्ट्रमच्या वापरामुळं रियल टाईम कम्युनिकेशन होणार आहे. ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन व्यवस्थेमुळे रेल्वे व्यवस्था मजबूत होणार आहे. रेल्वेला 4G स्पेक्ट्रम संदेशवहन प्रणाली विकसित करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम येत्या 5 वर्षात पूर्ण होईल.

    तेलंगाणातील खत कंपनीला अनुदान

    2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर नव्यानं स्थापन होणाऱ्या खतनिर्मिती कंपनीला अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार तेलंगाणातील रामगुंडम फर्टिलायजर आणि केमिकल फॅक्टरी स्थापन झाली आहे. या धोरणानुसार रामगुंडम खतनिर्मितीला कंपनीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील कंपनीतून 12 लाख 70 हजार मेट्रिक टन यूरिया उत्पादन होईल. यूरियाची आयात कमी होईल.

    PM MODI! Four major decisions of Modi government to provide relief to farmers; Read detailed

    Related posts

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान