pm modi Breakfast With Indian olympians : पंतप्रधान मोदींनी आज टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलासाठी नाश्त्याचे आयोजन केले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली आहेत. pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others
नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कमावणारा एकमेव गोल्डन बॉय आहे. त्याने भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या भारतीय कुस्ती संघाशी संवाद साधला. कुस्तीपटू रवी दहिया याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी बजरंग पुनियाला कांस्यपदक मिळाले.
टोकियो ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधान मोदींना ऑटोग्राफ केलेली हॉकी सादर केली. भारतीय पुरुष हॉकी संघाने भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे.
41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत पंतप्रधान मोदी. तत्पूर्वी, हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना सरप्राइज कॉल करत अभिनंदन केले होते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू पीएम मोदी यांना पदक दाखवताना. सिंधू दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू बनली आहे.
टोकियोला जाण्यापूर्वी पीएम मोदी पीव्ही सिंधूला म्हणाले होते की, टोकियोमध्ये तुमच्या यशानंतर मी तुमच्यासोबत आइस्क्रीम खाईन. आज हे वचन पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे.
pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर एका महिला आणि पुरुषाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत : ला पेटवून घेतले
- Afghanistan Crisis : काबूल एअरपोर्टवर गोळीबारात 5 ठार, उड्डाण घेतलेल्या विमानातूनही तीन प्रवासी कोसळले, पाहा व्हिडिओ
- जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले
- शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र