मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.PM Kisan Samman Nidhi: Plan to double the amount of the scheme, get Rs 12000 instead of Rs 6000 in three installments
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.
दरम्यान केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना लवकरच मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्यांना दरवर्षी ६००० रुपयांऐवजी १२००० रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात.
असे तपासा पैसे मिळतील किंवा नाही
जर तुम्ही PM Kisan स्कीमसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.
१) सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
२)होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
३)Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
४)नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
५)यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
PM Kisan Samman Nidhi: Plan to double the amount of the scheme, get Rs 12000 instead of Rs 6000 in three installments