आपण मनुष्यप्राणी जमिनीवरच राहतो. त्यामुळे सागराच्या अथांगतेची कल्पना आपल्याला सहज कळत नाही. सागराच्या खाली एक महाप्रचंड असे वेगळेच विश्व साकारलेले आहे. विज्ञानाची अनेक गुपिते सागरात सामावलेली आहेत. त्याचा नव्याने शोध सतत लागत असतो. यातील काही विस्मयकारक गोष्टी जर आपण पाहिल्या तर याची साक्ष पटते.plants grow to a depth of 107 meters below sea level?
समुद्राच्या तळाशी जसे आपण जावू तसे तेथे सागराची वेगवेगळे रुपे पहायला मिळतात. नव्या सागरी संशोधनात पाण्याखालील नव्या विश्वावर प्रकाश पडला आहे. समुद्राच्या तळाशी 107 मीटर खोलीपर्यंत वनस्पती उगवू शकतात. सागराच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या माशांचा रंग साधारणपणे निळा, हिरवा किंवा जांभळा असतो.
जस जसे आपण अधिक खोल जावू तसा माशांचा रंग बदलत जातो. 180 मीटरच्या खाली मासे फिकट रंगाचे तसेच सिल्व्हर रंगाचे असतात. काही मासे सागराच्या तळाशी तीन हजार मीटरपर्यंतही राहतात. अशा डार्क समुद्रात राहणारे मासे स्वतः प्रकाश सोडतात. पॅसिफीक महासागर हा जगातील सर्वांत खोल व मोठा महासागर आहे. रेड सी हा सर्वात क्षारयुक्त आहे. येथील क्षारांचे प्रमाण इतके मोठे आहे की तेथे कोणतीही वनस्पती जगू शकत नाही.
त्यामुळे रेड सी ला डेड सी किंवा मृत समुद्र असेही म्हणतात. या पाण्यात कोणताही व्यक्ती बुडू शकत नाही. अधिक क्षारामुळे तो तरंगतो. समजा जर समुद्रातील सर्व पाण्याचे उकळून मीठ केले तर पृथ्वीवरील सर्व गोष्टीवंर पाचशे फूट जाडीचा थर मावेल इतके मीठ त्यातून निर्माण होईल. भारतीय महासागर हा जगातील सर्वांत गरम किंवा उष्ण सागर आहे. याच्या पृष्ठभागाचे तापमान कधी कधी 36 डिग्रीवर जाते. त्यामुळे तेथे राहणारे जलचर वेगळेच असतात.