• Download App
    पिझ्झा लंगर.. हे तर कॅनडीयन स्टाईल शेतकरी आंदोलन | The Focus India

    पिझ्झा लंगर.. हे तर कॅनडीयन स्टाईल शेतकरी आंदोलन

    दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी नक्वी यांनी भेट दिली. या ठिकाणी मोफत असलेल्या पिज्झा लंगरला त्यांनी भेट दिली. त्याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पत्रकार सबा नक्वी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पिज्झा लंगरला भेट दिल्याचे ट्विट केल्यावर शेतकरी आंदोलनाची पोल खुलली असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. फुकटात पिज्झा, फुट मसाज, बियार्णी वाटली जात असलेले हे कॅनडीयन स्टाईल आंदोलन आहे, अशी टीका होत आहे. Pizza langar in farmer protest new delhi

    शेतकरी आंदोलनात अर्बन नक्षलवादी आणि दंगलीतील आरोपीही.. झळकली धक्कादायक पोस्टर्स

    दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी नक्वी यांनी भेट दिली. या ठिकाणी मोफत असलेल्या पिज्झा लंगरला त्यांनी भेट दिली. त्याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला. यावरून ज्येष्ठ चित्रकर्मी अशोक पंडीत यांनी नक्वी यांना चांगलेच सुनावले आहे. खलिस्थानीा, पाकिस्तानी, नक्षली प्रायोजित पिकनिकचा मजा घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.

    Pizza langar in farmer protest new delhi

    या आंदोलनाची पोल खुलली आहे. श्रीमंत शेतकºयांचे हे आंदोलन आहे. त्यांना खरेच आंदोलन करण्याची गरज आहे का? असा सवालही केला जात आहे. एका नेटकºयाने म्हटले आहे की दिल्ली दंगलीनंतर आता रस्ते ब्लॉक करून खलिस्थानवादी सरकारला धमक्या देऊ लागले आहेत. दुसºया बाजुला हे लक्झरीअस शेतकरी आंदोलन पाहिल्यावर खरोखरच त्यांच्या खरोखरच शेतीसंदभार्तील मागण्या आहेत की दुसरचा काही हेतू आहे, असेही विचारले जाऊ लागले आहे. पिज्झा लंगर, फुट मसाज करणारे हे कॅनडीयन स्टाईल आंदोलन असल्याची टीका होत आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…