PHOTOS Republic Day : देश आज ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशवासीयांमध्ये मोठा उत्साह यानिमित्ताने दिसून येत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये 15 ते 16 हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या जवानांनीही पूर्ण उत्साहात ध्वजारोहण केले.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देश आज ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशवासीयांमध्ये मोठा उत्साह यानिमित्ताने दिसून येत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये 15 ते 16 हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या जवानांनीही पूर्ण उत्साहात ध्वजारोहण केले. उणे ४० डिग्री सेल्सिअस तापमानातही आयटीबीपीचे जवान पूर्ण उत्साहात दिसले. दुसरीकडे, लडाखमध्ये 15000 फूट उंचीवर -40 डिग्री सेल्सियस तापमानात तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
हिमाचल प्रदेशातही सैनिकांनी ध्वजारोहण केले. येथील तापमान 16 हजार फुटांवर उणे 30 अंश आहे.
हा फोटो लडाखचा आहे. येथे ITBP जवानांनी 15 हजार फूट उणे 40 अंशांवर प्रजासत्ताक दिन साजरा केला.
ITBPच्या ‘हिमवीर’ ने उत्तराखंडमधील औली येथे उणे 20 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान 11,000 फूट उंचीवर तिरंगा फडकावला.
ITBP जवानांनी उत्तराखंडमध्ये -30 अंश तापमानाच्या दरम्यान 14 हजार पीट उंचीवर साजरा केला. लडाखमधील काराकोरम पास ते अरुणाचल प्रदेशातील जचेप ला पर्यंतच्या 3,488 किमीच्या सीमेवर पर्वतारोहणाचे प्रशिक्षण घेतलेल्या ITBP अधिकाऱ्यांचे विशेष पर्वतीय दल.
सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्सनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जेसीपी अटारी येथे मिठाईचे वाटप केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी नागपुरातील संघ मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला.
ओडिशाचे राज्यपाल गणेशीलाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रजासत्ताक दिनी भुवनेश्वरमध्ये राष्ट्रध्वज फडकवला.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही राजधानी जयपूरमध्ये तिरंगा फडकवला.
तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही तिरंगा फडकवला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ध्वजारोहण केले.