विशेष प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या स्थायी समिती चेअरमन नितीन लांडगे याचा स्वीय सहाय्यकाला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे .
स्थायी समितीची सभा सुरु असताना बुधवारी ही करवाई झाल्याने राज्यात खळबळ उडाली.
ज्ञानेश्वर पिंगळे असे लाच स्वीकाणाऱ्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. स्थायी समितीचा चेअरमन नितीन लांडगे यालाही लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यानी ताब्यात घेतले आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना लाचलुचपत विभागाच्या कारवाई झाल्याने राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली.
- पिंपरीत लाच स्वीकारताना स्वीय सहायक जेरबंद
- ९ कोटींचे टेंडर पास करण्यासाठी २ लाखांची लाच
- स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याला पकडले
- स्थायीचे अध्यक्ष नितीन लांडगे यालाही घेतले ताब्यात
- लाचलुचपत विभागाची सभेवेळी कारवाई
- कारवाई झाल्याने राज्यभरात प्रचंड खळबळ