लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे. मुलांना मारा, रागवा आणि शिकवा असं कोणीही म्हणत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात बदल घडवून आणू शकतो. हसरे, विनोद सांगणारे, जोरात न रागावणारे शिक्षक मुलांना आवडतात. गोष्टी सांगणारे शिक्षक लोकप्रिय असतात, याचं कारण हेच आहे. Permit children for expressing emotions
गोष्टींमध्ये भावना असतात. त्या रूक्ष अभ्यासामध्ये नसतात. त्यातली रूक्षता काढून अभ्यासही रंजक करणारे शिक्षक सर्व शाळांमध्ये असतात. तेच लोकप्रिय असतात. शिकण्याच्या एकेक अनुभवात आनंद असायला काय हरकत आहे? हे अनुभव चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. शिक्षकांनी दिलेली शाबासकी, शाळेच्या काच फलकात लावलेला निबंध, मुद्दाम घेतलेलं नाव या जाणिवा सुखद असतात.
स्वत:च्या प्रयत्नाने जमलेलं गणित, उत्तम काढलेलं चित्र, चटकन पाठ झालेली कविता याचा आनंद होतो. या आनंदाचे अनुभव व्हायला हवेत. अशा आनंदी भावना जोडलेल्या असल्या की लक्ष आपोआप लागतं. लक्ष दिलं की लक्षातही राहतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. बालवाडी- पहिल्या-दुसरीतल्या मुलांना शिक्षकांच्या जवळ जायला, त्यांना स्पर्श करायला आवडतो. ही त्यांची प्रेमाची भावना असते. ती त्यांना व्यक्त करायची असते. त्यामुळे या वर्गात मुलं शिक्षकांच्या आसपास घुटमळताना दिसतात. मोठय़ा वर्गामध्ये असं दृश्य दिसत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात बदल घडवून आणू शकतो.
हसरे, विनोद सांगणारे, जोरात न रागावणारे शिक्षक मुलांना आवडतात. गोष्टी सांगणारे शिक्षक लोकप्रिय असतात, याचं कारण हेच आहे. गोष्टींमध्ये भावना असतात. त्या रूक्ष अभ्यासामध्ये नसतात. त्यातली रूक्षता काढून टाकून असा अभ्यासही रंजक करणारे शिक्षक सर्व शाळांमध्ये असतात. तेच लोकप्रिय असतात.
भावना ही माणसाला मिळालेली एक वेगळ्या प्रकारची देणगी आहे. भावनांमध्ये गुंतली तरी बुद्धी योग्य प्रकारचे निर्णय घेऊ शकते. त्यालाच भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. ती जोपासण्यासाठी योग्य वेळी भावना व्यक्त करणं, त्या थोपवणं हे ही तितकंच महत्त्वाचं असतं.