नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. हिंदू राष्ट्र घोषित करुन नेपाळमध्ये राजेशाही लागू करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. हिंदू राष्ट्र घोषित करुन नेपाळमध्ये राजेशाही लागू करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. People on the streets to declare Nepal a Hindu nation
नेपाळच्या नागरिकांनी देशातील राजकीय नेते, पक्ष त्यांची जबाबदारी विसरले असल्याचा आरोप केला आहे. राजेशाही व्यवस्था लागू करण्याची मागणी नेपाळच्या विश्व हिंदू महासंघ, शैव सेना नेपाल, राष्ट्रीय सरोकार मंच, गोरक्षनाथ नेपाळ या संघटनांनी केली आहे.
आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शक्ती नेपाळचे अध्यक्ष केशव बहादूर बिस्टा यांनी हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. बिस्टा यांनी तीन मागण्या केल्या आहेत. नेपाळमध्ये संविधानिक राज्यपद्धती जाहीर करावी. नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करावे, देशातील संघीय राज्यपद्धती संपवण्यात यावी, अशीही मागणी केशव बहादूर बिस्टा यांनी केली.
नेपाळचे पंतप्रधान ओली नरमले, जुना नकाशा केला शेअर
People on the streets to declare Nepal a Hindu nation
सध्याचे के.पी. शर्मा ओली यांचे सरकारने सामान्य जनतेला संकटात ढकले आहे, असा आरोप बिस्टा यांनी केला. नेपाळनं 2008 मध्ये 240 वर्ष जूनी राजेशाही पद्धत रद्द करुन लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली होती. 2015 मध्ये नेपाळमध्ये नवे संविधान बनवण्यात आले. त्यानंतर देशाला लोकशाही संघराज्य प्रजासत्ताक देश घोषित केले गेले. संविधानानुसार 2017 मध्ये नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये नेपाळमधील मार्क्सवादी पक्ष सत्तेत आला. प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये पृथ्वी नारायण शाह यांचे पोस्टर हाती घेतले होते. पृथ्वी नारायण शाह 18 व्या शतकातील आधुनिक नेपाळचे संस्थापक होते.