• Download App
    लोकांना कदाचित २०२४ ची वाटही पाहावी लागणार नाही; भ्रष्टाचाराची १० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर ओम प्रकाश चौटाला प्रथमच बोलले people may not have to wait till 2024 to defeat BJP in centre, claims om prakash chautala

    जनता भाजपला कंटाळल्याने लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होतील; भ्रष्टाचाराची १० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर ओम प्रकाश चौटाला प्रथमच बोलले

    प्रतिनिधी

    चंदीगड़ – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला तब्बल १० वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. त्यानंतर प्रथमच त्यांनी पहिले राजकीय वक्तव्य केले आहे. भारतीय जनतेला कदाचित २०२४ ची वाट देखील पाहावी लागणार नाही. कारण जनता भाजपच्या सरकारला एवढी वैतागली आहे, की केंद्र सरकारवर जनतेचा दबाव एवढा वाढेल की २०२४ पूर्वीच सरकारला लोकसभेच्या निवडणूका घ्याव्या लागतील, असा दावा ओमप्रकाश .चौटाला यांनी केला आहे. people may not have to wait till 2024 to defeat BJP in centre, claims om prakash chautala

    ओमप्रकाश चौटाला हे हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी असताना शिक्षकभरतीत घोटाळा झाला होता. त्या खटल्यात त्यांना आणि त्यांचे पुत्र अजयसिंह यांना १० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगून ते दोन आठवड्यांपूर्वीच बाहेर आले आहेत.

    त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे राजकीय वक्तव्य केले आहे. ओमप्रकाश चौटाला सध्या कोणत्याही राजकीय पदावर नाहीत. परंतु, हरियाणाचे सध्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंग चौटाला यांचे ते आजोबा आहेत. दुष्यंत सिंह हे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. असे असताना त्यांच्या आजोबांनी म्हणजे ओमप्रकाश चौटाला यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. म्हणून ओमप्रकाश चौटाला यांच्या वक्तव्याला राजकीय महत्त्व आहे.

    ओमप्रकाश चौटाला हे चार वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील चौधरी देवीलाल हे १९८९ मध्ये देशाचे उपपंतप्रधान होते. विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते.

    ओमप्रकाश चौटाला यांनी केंद्रातल्या कृषी कायद्यांच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. देशातले शेतकरी हे कृषी कायदे कदापी पाळणार नाहीत. शेतकरी एकजूट दाखवून लोकसभा निवडणूकीत भाजपचा पराभव करतील, असा दावा त्यांनी केला आहे.

    people may not have to wait till 2024 to defeat BJP in centre, claims om prakash chautala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…