वृत्तसंस्था
कोलकाता – खगोलप्रेमींसह चांद्रप्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. उद्या २६ तारखेला खग्रास चंद्रग्रहणानंतर पूर्वेकडी आकाशात ‘सुपर ब्लड मून’पाहता येईल. त्या रात्री चंद्र नेहमीपेक्षा ३० टक्के अधिक मोठा आणि १४ टक्के अधिक तेजस्वी दिसेल. People cane see super blood moon tomorrow
२६ मे ला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. संध्याकाळी सात वाजून २३ मिनिटांनी तो पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार ३०९ कि.मी.वर असेल. खग्रास चंद्रग्रहणानंतर चंद्र पृथ्वीपासून सर्वांत जवळ येईल. खग्रास चंद्रग्रहणामुळे चंद्र काळसर लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे, चंद्राची ही अवस्था ‘सुपर ब्लड मून’ म्हणून ओळखली जाते. या अवस्थेत चंद्राच्या लाल भागावरून प्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणात तुलनेने कमी विचलन होते.
येत्या २६ मे रोजी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा रेषेत येत आहेत, की पृथ्वीवरून चंद्र पूर्ण स्वरूपात दिसेल, त्याचवेळी काही काळ चंद्राला ग्रहणही लागेल. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना काही क्षणांसाठी पृथ्वीच्या सावलीतून जाईल. त्यामुळे, खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येईल. हे चंद्रग्रहण प्रामुख्याने पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक भाग आणि ऑस्ट्रेलियातून पाहता येणार आहे.
चंद्रग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी सव्वातीनला सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी संपेल.
People cane see super blood moon tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- Toolkit Case : दिल्ली पोलिसांनी ट्विटर ऑफिसवर छापेमारी नाकारली, म्हणाले – फक्त नोटीस दिली, छापा नव्हता!
- फायझर आणि मॉडर्नाकडे आधीच पुष्कळ ऑर्डर, लसीसाठी भारताला प्रदीर्घ वाट पाहावी लागण्याची शक्यता
- Cool PPE Kits : आता पीपीई किट्स घालून घामाघूम होणार नाहीत डॉक्टर्स, मुंबईच्या संशोधकाने तयार केले व्हेंटिलेशन पीपीई किट्स
- राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बंदीची मागणी करताहेत आणि सुप्रिया सुळे पुस्तक वाटतेय इंटरेस्टिंग
- निरंकुश सोशल मीडियावर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, मनमानी करणाऱ्या कंपन्यांना सरळ करणार