काळ आणि अवकाश अनंत आहेत. वाळूचे कण अगणित आहेत. या विश्वात असंख्य अणू आहेत, त्याचप्रमाणे तारे आणि आकाशगंगाही. या ग्रहावरील जीवनही असेच आहे. याला उगम नाही अन् अंतही नाही. कारण सर्व गोलाकार आहे. गोलाकृतीला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. ना ध्येय ना दिशा. Peace is the attainment of all answers, the search for peace is the answer
सत्याला दिशाही नाही, ध्येयही नाही, सत्य हेच ध्येय आहे आणि सत्य हेच अनंत आहे. या मर्यादित शरीरात अमर्यादतेला जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी, उभ्या आयुष्यात कालातीत जगण्यासाठी, दुःखात आनंद शोधण्यासाठी तर तुम्ही इथे आहात. जेव्हा हे ज्ञान उदयाला येते, आनंदसोहळा घडतो. पण या उत्सवाच्या नादात तुम्ही तुमचे उद्दिष्ट आणि जाणीव या गोष्टी हरवण्याची शक्यता असते. पुरातन ऋषींना हे माहिती होते. म्हणून उत्सवाच्या मौजमजेतही भान ठिकाणावर राहावे म्हणून त्यांनी प्रत्येक प्रसंगात पवित्रता आणि पूजा समाविष्ट केली. काही प्रश्नांची उत्तरे फक्त शांततेत देणे शक्य होते.
शांती हे सर्व उत्तरांचे साध्य असते. एखादे उत्तर मनाला शांत करत नसल्यास ते उत्तरच नव्हे. विचार हे साध्य असत नाहीत. त्यांचे साध्य म्हणजे शांती. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, मी कोण आहे? तेव्हा तुम्हाला काहीच उत्तर मिळत नाही. तिथे फक्त शांती असते. तेच खरे उत्तर आहे. तुमचा आत्मा म्हणजे घनरूप शांती आहे, आणि ही घनरूप शांतीच सुज्ञपणा, ज्ञान होय.
विचारांना शांत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भावनांना जागृत करणे, कारण भावनेमधूनच शांती, आनंद आणि प्रेम यांचा उदय होईल. मी कोण आहे? या प्रश्नाचे एकमेव समर्पक उत्तर म्हणजे शांतता. तुम्ही सारी शाब्दिक उत्तरे बाद करणे आवश्यक आहे. मी कोणी नाही. मी वैश्विक स्वत्व आहे किंवा मी आत्मा आहे यांच्या समवेत फक्त मी कोण आहे? या प्रश्नाला चिकटून राहा. बाकीची सारी उत्तरे म्हणजे नुसते विचार आहेत आणि विचार कधीही पूर्ण होणार नाहीत. फक्त शांतताच पूर्ण आहे.
Peace is the attainment of all answers, the search for peace is the answer