• Download App
    झोपेचा हिशेब चुकता करा । Pay the bill for sleep

    झोपेचा हिशेब चुकता करा

    स्वास्थ्य ही एक सर्वसमावेशक बाब आहे. त्यात केवळ रोगाचा अभाव व शरीर सुदृढ असणे अभिप्रेत नाही. देहाइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येत यासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्यालाही समान स्थान देण्यात आले आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत सुजाण कुटुंबातील कर्त्या जोडीने आपल्या स्वास्थ्याच्या या चारही बाजूंबाबत दक्ष असायला हवे. त्यासाठी योग्य जीवनशैलीचा अंगीकार करायला हवा. झोप, आहार, स्वच्छता, आनंदी वर्तणूक, पारदर्शी व्यवहार, दैनंदिन कामातील स्वारस्य, मैत्री, मनोरंजन, शारीरिक श्रम वा व्यायाम; या व अशा अनेक बाबींकडे डोळसपणे बघायला हवे. प्रत्येकाचे आयुष्य आपापल्या परीने वेगळे असते, याचेही भान राखणे गरजेचे असते. कारण आजच्या या माहिती स्फोटाच्या युगात इतके अकारण सल्ले व सूचना आपल्या काना-मनावर येऊन आदळत असतात, की त्यातले नेमके काय खरे व काय खोटे; याची शहानिशा न करता ते अंगीकारणे कधी फारच महागात पडू शकते. Pay the bill for sleep

    पुरेशी झोप केवळ शारीरिकच नव्हे, तर उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठीही आवश्य क आहे, यात शंकाच नाही. प्रत्येकाची झोपेची गरज वेगळी असू शकते. पण रोज किमान सात तास तरी झोप व्हायला हवी. कोणाला त्याहून जास्तही लागू शकते. अनेक जण आपली झोपेची व उठायची एक ठराविक वेळ पाळतात. काहींना ते जमत नाही. त्यांच्या वेळा बदलतात. मात्र एकूण विश्रांती तेवढी व्हायला हवी. बरीच मंडळी दुपारी जेवणानंतरही एक डुलकी काढतात. ती ही आरोग्यास उपयुक्त असल्याचे विज्ञान सांगते. काही वेळा रात्री जागावे, तर कधीतरी काही कारणानिमित्त मधेच किंवा पहाटे लवकर उठावे लागते. नंतर लवकर केव्हातरी तेवढी झोप घेऊन हिशेब चुकता करून टाकावा.

    Pay the bill for sleep

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!