विनायक ढेरे
नाशिक : पवार काका – पुतण्यांची युती फिसकटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकण्याची तयारी!!, हे राजकीय चित्र पुण्यातून समोर आले.Pawar uncle nephew failed to create alliance
भाजपने अजितदादांना महायुतीतून दूर सारल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले, पण अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी सोडून द्या आणि घड्याळ हाती घ्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवा, असा आग्रह धरल्यामुळे पुण्यातली काका – पुतण्यांची युती फिस्कटली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या दादागिरीला जुमानले नाही. एवढे होऊन सुद्धा शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे अजितदादांकडे गेले आणि त्यांना पिंपरी चिंचवड मध्ये तरी आघाडी करू, अशी गळ घातली. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चेचा घोळ पुढे सुरू राहिला.
– इतर पक्षांशी चर्चा करायची वेळ
पण दोन्ही पवारांची युती फिस्कटल्यामुळे दोघांची ताकद कमी झाली आणि दोघांनाही इतर पक्षांची चर्चा करायची वेळ आली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा सुरू केली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जाळे टाकायला सुरुवात केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, विशाल तांबे, मनाली भिलारे, बापू पठारे, अश्विनी कदम यांनी काँग्रेसच्या अरविंद शिंदे अभय छाजेड रमेश बागवे यांच्याशी चर्चा केली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे, गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांना सुद्धा चर्चेत सामील करून घेतले.
पवार काका पुतण्यांची युती फिस्कटल्यामुळे रवींद्र धंगेकर आनंदले भाजपकडून मान नको आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा अपमान नको अशी भूमिका घेऊन त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चेची तयारी दाखविली अर्थात खुद्द एकनाथ शिंदे यांनी अद्याप तरी त्याला दुजोरा दिलेला नाही.
– भाजपच्या डावपेचा मुळे पवारांची फरफट
पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे पवार काका – पुतण्यांना आघाडी करूनच निवडणूक लढवायची होती. कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, पण दोघांची आघाडी फिस्कटल्याने दोघांनाही इतर पक्षांची गरज भासायला सुरुवात झाली म्हणून त्यांनी इतर पक्षांवर जाळे टाकायची तयारी चालवली. भाजपच्या डावपेचांनी पुण्याच्या राजकारणात पवार काका – पुतण्यांची अशी फरफट केली.
Pawar uncle nephew failed to create alliance
महत्वाच्या बातम्या
- पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आघाडी करताना अजितदादांचा डाव; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीवरच घातला घाव!!
- Odisha Encounter : ओडिशातील 1 कोटी रुपयांचा बक्षीस असलेला नक्षलवादी ठार; कंधमाळमध्ये 2 महिलांसह 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान
- भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यातल्या जागावाटपात दोघांची खेचाखेची!!
- Karbi Anglong : कार्बी आंगलोंग हिंसाचार-11 हजार लोक घरात कैद, बाजार बंद; सैन्याचा 12 गावांमध्ये फ्लॅग मार्च