काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तुर्कस्थानची मदत घेत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने काश्मीरमधील वातावरण अस्थिर करण्याचं षडयंत्र रचत असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. pakistan latest news
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तुर्कस्थानची मदत घेत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने काश्मीरमधील वातावरण अस्थिर करण्याचं षडयंत्र रचत असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. pakistan latest news
पत्रकार आंद्रियास माउंटजोरालियास यांनी आपल्या अहवालामध्ये दावा केला आहे की पाकिस्तान आणि तुर्की एकत्र येऊन काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण तयार करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. यानुसार तुर्की सीरियातील तरुणांना काश्मिरमध्ये पाठवण्याचा कट रचत आहे. यात तुकीर्चे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांचाही समावेश आहे.
pakistan latest news
तुर्कीला दक्षिण आशियातील मुस्लिमांवर आपला प्रभाव वाढवायचा आहे. त्याचाच भाग म्हणून हा कट आखला जात आहे. आतापर्यंत दक्षिण आशियातील मुस्लीम समुहात सौदी अरबचा अधिक प्रभाव आहे. या योजनेत पाकिस्तान देखील तुकीर्सोबत आहे. तुर्की आणि पाकिस्तान मिळून यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या सैन्यामध्ये देखील सहभाग वाढवत आहेत.