- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर आनंद व्यक्त करताना आझाद म्हणाले, ‘कोणीतरी माझ्या कामाची दखल घेतली हे छान वाटले.’PADMA BHUSHAN AWARD: Azad Azad! When the country and the government take care of one’s work ….! Someone noticed my work: Ghulam Nabi Azad
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपती भवनात आयोजित औपचारिक कार्यक्रमात गुलाम नबी आझाद यांना हा सन्मान मिळाला. त्याचवेळी यावर आनंद व्यक्त करत गुलाम नबी आझाद म्हणाले ‘माझ्या कामाची कुणीतरी दखल घेतली ….PADMA BHUSHAN AWARD: Azad Azad! When the country and the government take care of one’s work ….! Someone noticed my work: Ghulam Nabi Azad ..
गुलाम नबी आझाद यांनी पुढे म्हटले की, “देशाने कोणत्याही कामाला प्रोत्साहन दिले, तर अधिक चांगले काम करण्याची इच्छा मनात निर्माण होते आणि मला वाटते की कोणीतरी माझे काम ओळखले हे चांगले आहे. हा पुरस्कार राष्ट्राच्या वतीने दिला जातो.
दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे .
पद्मभूषण मिळाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतंय, हे पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पण यातून आझाद यांचा रोख थेट काँग्रेसवर असल्याचं बोललं जात आहे. “कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली हे पाहून आनंद झाला. जेव्हा देश किंवा सरकार एखाद्याच्या कामाची दखल घेतं, तेव्हा चांगलं वाटतं”, असं आझाद म्हणाले आहेत.
“माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण या काळात देखील मी कायमच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. मग ते सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा मग अगदी जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री म्हणून असो”, असं देखील आझाद म्हणाले. “हे सगळं पाहाता केंद्र सरकारकडून आणि देशाच्या जनतेकडून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे”, असं त्यांनी नमूद केलं
यंदाच्या वर्षी एकूण ५ पद्मभूषण, १७ पद्मविभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कर प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये गुलाम नबी आझाद आणि माकपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य या दोन विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता.