• Download App
    आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!! overcame proudly sad history of aggressers to become new destination

    आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!

    तब्बल एक हजार वर्षांच्या आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी पुन्हा सोन्यासारखी झळाळून उठली आहे. इतिहास कधी असा करवट घेतो, की भारताचे सुवर्णयुग पुन्हा जवळ आल्यासारखे वाटते. ते सुवर्णयुग पुन्हा काशी विश्वनाथ धामच्या रूपाने सुरू झाले आहे…!! Kashi : overcame proudly sad history of aggressers to become new destination of progressive India
    क्रूर – धर्मवेड्या मुस्लीम आक्रमकांमुळे काशीचा इतिहास मध्ययुगात तमोमय असला तरी प्राचीन युगात सुवर्णासारखा तप्त आणि झळाळून उठणाराच होता. या इतिहासाने सनातन धर्माचे अनेक पैलू पाहिले आहेत. गंगेच्या शुद्ध प्रवाहासारखे नित्यनूतन धर्माचे अधिष्ठान वाहिले आहे. काशी सनातन धर्माची पताका जगात उंचावणारे शहर राहिले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोर चे उद्घाटन होताना करोडो भारतीयांच्या मनात या देदिप्यमान इतिहासाची उजळणी होत आहे…!!

    काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट; कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


    काशीचे पौराणिक महत्त्व
    काशी तीर्थक्षेत्र काशी – वाराणसी – बनारस हे शहर काशी, असी तसेच वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला ‘वाराणसी’ हे नाव पडले. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. हे शहर बनारस, वाराणसी, काशी, अविमुक्त शंकराच्या वास्तव्यामुळे आनंदकानन/आनंदवन, काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास श्रीशिवपुरी या नावांनी ओळखले जाते.
    येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. हे जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर आहे. महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने हे शहर वसविल्यामुळे यास काशी, काशिका अशी नावे पडली.
    •  काशी गंगाकिनारी बांधलेले घाट
    •  अमरोहा/अमरावगिरी/बाउली घाट, अस्सी घाट, अहिल्याबाई घाट, माता आनंदमयी घाट, कर्नाटक घाट,
    •  केदार घाट, खिडकी घाट, खोरी घाट, गंगामहाल घाट-१, गंगामहाल घाट-२,
    •  गणेश घाट, गुलेरिया घाट (मूळ), गुलेरिया घाट/नया घाट, गोल घाट,
    •  चेतसिंग घाट, चौकी घाट, चौसत्ती घाट, जलासेम (जलाशायी) घाट, जातरा घाट,
    •  जानकी घाट, जैन घाट, तुलसी घाट, तेलियानाला घाट, त्रिपुरभैरवी घाट,
    •  त्रिलोचन घाट, दरभंगा घाट, दशाश्वमेध घाट, दांडी घाट, दिग्पतिया घाट,
    •  दुर्गा घाट, नंदेश्वर/नंदू घाट, नारद घाट, निरंजनी घाट,
    •  निषाद घाट, नेपाळी/घाट, पंचअग्नी अखाडा घाट, पंचकोट घाट, पंचगंगा घाट,
    •  पांडे घाट, प्रभू घाट, प्रयाग घाट, प्रल्हाद घाट, फुटा/नया घाट,
    •  बद्रीनारायण घाट, बाजीराव घाट, बुंदी परकोट घाट, ब्रह्मा घाट, भदैनी घाट,
    •  भैसासुर घाट, भोसले घाट, मंगलागौरी/बाला घाट, मनकर्णिका घाट, मनमंदिर घाट,
    •  महानिर्वाणी घाट, मानससरोवर घाट, मीर घाट, मुनशी घाट, मेहता घाट,
    •  राजा घाट, राजा ग्वाल्हेर घाट, राजेंद्रप्रसाद घाट, राणा महाल घाट, राणी घाट,
    •  राम घाट, रावण/रीवा घाट, ललिता घाट, लली घाट, लाल घाट,
    •  वत्सराज घाट, विजयनगर घाट, वेणीमाधव घाट, शाक्य घाट, शिवाला घाट,
    •  (आदि) शीतला घाट, संकट घाट, सर्वेश्वर घाट, सिंदिया घाट, सोमेश्वर घाट,
    •  हनुमान घाट, जुना हनुमान घाट, हनुमानगारदी घाट, हरिश्चंद्र घाट, क्षेमेश्वर घाट.
    •  मुस्लीम आक्रमकाकडून विध्वंस
    स्कंद पुराण या इ. स. पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे माहात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिर पन्हा बांधले. परंतु क्रूर -धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला.
    सवाई जयसिंगया विज्ञानप्रिय राजाने सन १७३७ मध्ये बनारसमधील मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. १७८३ च्या आधीपासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी “एकनाथी भागवत” हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.काशी येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज १७९१ मध्ये स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथेच बनारस हिंदू विद्यापीठ आहे.
    – मंदिरांचे शहर 
    काशी शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.
    ‘काश्यां तु मरणमुक्तिः’ – काशीत मरण आल्यास त्या जिवाला मुक्ती मिळते असा समज आहे. काशी, गया आणि प्रयाग अशी त्रिस्थळी यात्रा करण्याचा रिवाज आहे. काशीला गंगा, यमुना, सरस्वती, किरणा व धूतपापा या नद्या पंचगंगेच्या स्वरूपात आहेत.
    प्रख्यात भारतीय संतकवी कबीर, रविदास आणि राम चरित मानस लिहिणारे तुलसीदास हे शहराचे रहिवासी होते. कुळुका भट्ट यांनी १५ व्या शतकात वाराणसीत राहून मनुस्मृती या नावाचे लिहिलेले पुस्तक आहे.
    वाराणसी कला आणि डिझाईनचे एक प्रमुख केंद्र आहे. ब्रिटिश राजवटीतील लष्करी छावणीची स्मशानभूमी ही वाराणसीच्या कला व शिल्पांचे स्थान आहे.
    प्राचीन आख्यायिकेनुसार, विकसित संगीत आणि नृत्य प्रकारांचे श्रेय शिव यांना जाते. मध्ययुगीन काळात, भक्ती चळवळी लोकप्रियतेत वाढ आणि वाराणसी सूरदास, कबीर, रविदास, मीरा आणि तुळशीदास या संगीतकारांचे उत्कर्ष केंद्र बनले.
    महाशिवरात्रि रोजी शिवांची मिरवणूक महामृत्युंजय मंदिर ते काशी विश्वनाथ मंदिरा पर्यंत असते. हनुमान जयंती (मार्च ते एप्रिल) साजरी केली जाते. विशेष पूजा, आरती आणि सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन केले जाते. १९२३ पासून मंदिराच्या वतीने संगीत मोचन समरोह नावाचा पाच दिवसीय शास्त्रीय संगीत व नृत्य मैफिलीचे आयोजन करण्यात येते, ज्यात भारतातील सर्व भागातील कलाकारांना सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते. काशी नरेश पुरस्कृत नाटक दररोज संध्याकाळी ३१ दिवस रामनगरात सादर केली जातात. उदित नारायण सिंह यांनी १८३० च्या सुमारास काशी नरेश ही परंपरा सुरू केली.
    (संदर्भ : santsahitya.in)

    Kashi : overcame proudly sad history of aggressers to become new destination of progressive India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!