• Download App
    One Stop Center : परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना केंद्र सरकारचे संरक्षण ; ९ देशात सुरू करणार 'One Stop Center' One Stop Center: Central Government protects Indian women working abroad; To launch 'One Stop Center' in 9 countries

    One Stop Center : परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना केंद्र सरकारचे संरक्षण ; ९ देशात सुरू करणार ‘One Stop Center’

    • परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना  केंद्रांची मदत मिळणार आहे. बर्‍याच वेळा या देशांमध्ये भारतीय महिला हिंसाचाराचा बळी ठरतात. 

    • सध्या सरकार नऊ देशांमध्ये ‘one stop center’ उघडणार आहे .येत्या काही दिवसांत अन्य देशांमध्ये अशी केंद्रे उघडण्याची तयारी.
    • जर एखाद्या महिलेस कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन करावा लागला असेल तर तिला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, तात्पुरती निवास व्यवस्था, मानसिक आणि भावनिक सहाय्य करणे आवश्यक आहे.One Stop Center: Central Government protects Indian women working abroad; To launch ‘One Stop Center’ in 9 countries

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: परदेशात काम करणार्या भारतीय महिलांना मदत करण्यासाठी भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत सरकार नऊ देशांतील नोकरदार महिलांसाठी ‘one stop center’ उघडणार आहे. महिला व बाल विकास (डब्ल्यूसीडी) सचिव राम मोहन मिश्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की बहरेन, ओमान, युएई, कतार, कुवैत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि सिंगापूर येथे ही केंद्रे सुरू केली जातील. तसेच सौदी अरेबियामध्ये दोन केंद्र सुरू केले जातील.One Stop Center: Central Government protects Indian women working abroad; To launch ‘One Stop Center’ in 9 countries

    पीडित महिलांना मदत

    मिश्रा म्हणाले, ‘ही केंद्रे सुरू करण्याचा उद्देश या देशांमध्ये काम करणार्या भारतीय महिलांना मदत करणे आहे. ही केंद्रे या देशांमधील महिलांना हिंसाचाराच्या बाबतीत मदत करतील. सुरुवातीला ही केंद्रे नऊ देशांमध्ये सुरू केली जात आहेत, परंतु भविष्यात ही इतर देशांमध्येही सुरू केली जातील.

    ही केंद्रे परराष्ट्र मंत्रालयामार्फत चालविली जातील 

    भारतात महिलांसाठी असे one stop center सुरू आहेत. जिल्ह्यांमध्ये राबविल्या गेलेल्या या यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंसाचार व संकटाचा सामना करणार्‍या महिलांना वैद्यकीय सुविधा, कायदेशीर मदत, कायदेशीर सल्ला, मानसिक सल्ला आणि तात्पुरते आश्रय यासह अनेक सुविधा मिळतात. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र  मंत्रालयाने या देशांची नावे पटवून दिली आहेत जेथे मोठ्या प्रमाणात प्रवासी  भारतीय आहेत. परराष्ट्र मंत्रालय ही केंद्रे चालवणार असून त्यांना डब्ल्यूसीडी मंत्रालयाकडून अर्थसहाय्य दिले जाईल.

    देशात अशी ७०० केंद्रे आहेत, 

    एक वरिष्ठ अधिकारी सांगतात, “परदेशात काम करणार्या भारतीय महिलांना या केंद्रांची मदत मिळणार आहे. बर्‍याच वेळा या देशांमध्ये भारतीय महिला हिंसाचाराच्या बळी ठरतात किंवा एखाद्या विचित्र परिस्थितीत अडकतात. अशा परिस्थितीत त्या मदतीसाठी या केंद्रांपर्यंत पोहोचू शकतात. देशात सुमारे ७०० ‘one stop center’ कार्यरत आहेत. डब्ल्यूसीडी मंत्रालय यावर्षी देशात अतिरिक्त ३०० केंद्रे उघडण्याची तयारी करत आहे.

    ‘वन स्टॉप सेंटर योजना’ म्हणजे हिंसाचाराने त्रस्त असलेल्या कोणत्याही महिलेला एकाच छताखाली सर्व प्रकारच्या मदतीची व्यवस्था मिळू शकते. ही केंद्रे रुग्णालयात चालवली जातात, जेथे वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, तात्पुरती राहण्यासाठी जागा, खटला दाखल करण्यास मदत, समुपदेशन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

    One Stop Center: Central Government protects Indian women working abroad; To launch ‘One Stop Center’ in 9 countries

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!