विशेष प्रतिनिधी
पुणे : फोटोसाठी वाट्टेल ते करण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. असाच प्रकार पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात घडला. चक्क स्कॉर्पिओ गाडीच्या बॉनेटवर बसून फोटो आणि व्हिडीओ काढल्यामुळे नवरीवर लग्नाच्या दिवशीच गुन्हा दाखल झाला आहे. On the day of the wedding, a crime was registered against the bride
पुण्यातील नवरीचे वऱ्हाड सासवड येथे चालले होते. यावेळी दिवे घाटात नवरी मुलगी चक्क स्कार्पिओ गाडीच्या बॉनेटवरून बसून फोटो आणि व्हिडीओ काढत होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेून लोणी काळभोर पोलिसांनी काही तासातच नवरी मुलीचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
नवरी मुलीचे वय तेवीस असून ती भोसरी येथे राहणारी आहे. तिच्यासह इतर पाच जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 269, 188, 279, 107, 336, 34 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड उपाय योजना 2020 चे कलम 11 मो.व्हॅ.अॅक्ट 119/177,184 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवरी मुलीचा विवाह सासवड येथे झाला. त्यासाठी ती आणि तिचे नातेवाईक भोसरीमधून स्कार्पिओतून सासवड येथे जात होते. यावेळी त्यांनी दिवे घाटात आल्यानंतर फोटो शूट केले. पण, त्यांचे हे फोटो शूट करत असताना गाडीच्या बोनेटवर बसून, काही अंतर जात असतानाचा फोटो देखील काढला. हे फोटो सेशन सुरू असताना मात्र कोणीतरी त्याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला आणि तो व्हायरल केला.
आज विवाह असल्याने पोलिसांनी त्यांना तोंडी कारवाईची माहिती दिली आहे. विवाह झाल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
On the day of the wedding, a crime was registered against the bride
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोले राज्यातील अतिमहत्त्वाचे नेते, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये, संजय राऊतांचा सल्ला
- पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत बैठक, कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर काय निर्णय घेणार?
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे घुमजाव, म्हणाले – ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, माझा आरोप राज्य नव्हे, तर केंद्र सरकारवर!
- नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू