• Download App
    संचारबंदी धुडकावून कव्वालीवर थिरकले खासदार इम्तियाज जलील ; कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी On Qawwali, breaking the curfew Thirakle MP Imtiaz Jalil

    WATCH : संचारबंदी धुडकावून कव्वालीवर थिरकले खासदार इम्तियाज जलील ; कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद येथे कोरोना संचारबंदी लागू आहे. पण, कोरोनाची नियमावली झुगारून खासदार इम्तियाज जलील कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. विशेष म्हणजे त्यात सामील झाल्याच्या एकावर मास्क नव्हता. तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नाही. On Qawwali, breaking the curfew Thirakle MP Imtiaz Jali

    दौलताबाद देतील उंबर फार्महाऊसवर हा कव्वालीच्या कार्यक्रम रंगाला. रात्री झालेल्या कार्यक्रमाला मित्र आणि आपल्या अनेक समर्थकांसह हजेरी लावून खासदार जलील यांनी त्याचा आनंद लुटला. यावेळी खासदारांनी आणि समर्थकांनी मास्क लावला नव्हता. ज

    मावबंदी संचारबंदी असताना कार्यक्रम निर्बंध सुरु होता. गाण्यावर थिरकणाऱ्या खासदारांवर अक्षरशा नोटा उधळण्यात आल्या.रात्री बाराच्या सुमारास पोलिसांना दौलताबाद येथील कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी अनेकजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. खासदार मात्र नामानिराळे राहिले. यापूर्वीही 31 मार्च रोजी शहरात आल्यानंतर नियम धाब्यावर बसून खासदार यांची मिरवणूक काढली होती. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

    On Qawwali, breaking the curfew Thirakle MP Imtiaz Jali

    •  खासदार इम्तियाज जलील कव्वालीवर थिरकले
    •  दौलताबादच्या उंबर फार्महाऊसवर रंगाला कार्यक्रम
    •  संचारबंदी आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडविले
    •  एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क नव्हता
    •  सोशल डिस्टनसिंगचा उडाला पुरता फज्जा
    •  कव्वालीवर नाच आणि नोटांची उधळण
    •  खासदारांवरही नोटांची उधळण

    Related posts

    बिहारमध्ये उद्या निकालाच्या दिवशीच “नेपाळ” + “बांगलादेश” घडवायची लालूंच्या पक्षाची तयारी; दमबाजी करणाऱ्या नेत्याविरुद्ध FIR!!

    नाशिक मध्ये मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन; जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

    आधीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून देणाऱ्या मुंबईत असदुद्दीन ओवैसींचा AIMIM पक्ष एकटा देणार 50 उमेदवार; कुणावर होणार परिणाम??