वृत्तसंस्था
येवला – येवला तालुक्यातील गोल्हेवाडी येथील शेतकरी सुभाष कोतकर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये मेथीच्या भाजीचे पीक घेतले होते . On fenugreek vegetables Rotated rotor
भाजी निघण्यास सुरुवात झाली. मात्र या मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मेथीची भाजी विक्री होत नसल्याने आपली जनावरे चरण्यास सोडली तसेच स्वतःच्या हाताने भाजी उपटून टाकत संपूर्ण मेथीचे भाजी ही ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर मारून नष्ट करून टाकली.
- मेथीच्या भाजीवर फिरवला रोटर
- येवल्यात धक्कादायक घटना
- कवडीमोल भाव मिळत असल्याने निर्णय
- अगोदर शेतात जनावरे सोडली
- नंतर हाताने मेथीच्या पेंड्या उपटल्या
- मेथीवर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरविला