ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : दक्षिण आफ्रिके शंभराहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते पाच ,किंवा पाच वर्षांखालील मुलांची रुग्ण संख्या अधिक आहे. तर 60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होत आहे.
ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18 वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जी मुले शाळेत जाणार आहेत त्यांच्या आईवडिलांनीही कटाक्षाने लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे IMA चे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.
ओमिक्रॉनचा पसार खूप वेगाने होत आहे. डेल्टापेक्षा पाचपट वेगाने तो पसरत असल्याचे संशोधक सांगत आहेत. आता त्याची लक्षणे सौम्य आहेत.
मृत्यू झालेला नाही. परंतु जेव्हा ६० च्यापुढच्या वयोवृद्ध नागरिकांना जेव्हा याची लागण होईल तेव्हा मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी खबरदारी म्हणजे नागरिकांनी कंपल्सरी मास्कचा वापर केला पाहिजे तसेच सोशल डिस्टसन्सचे पालन करणे आवश्यक आहे.याबरोबर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
मात्र अनेक लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळ येत्या गर्दी कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.
येत्या दोन आठवड्यात ओमिक्रॉनचा विषाणू मुळे नेमका किती धोका आहे. याची माहिती मिळेल.तोपर्यंत आपल्याकडची गर्दी आटोक्यात आहे असे वाटले ठीक नाही तर कदाचित लॉकडाऊन करावे लागेल.