विशेष प्रतिनिधी
नागपूर:नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. मागील दिवसांतील चाचपणी केली असता मुंबई आणि पुण्यानंतर आता ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण नागपूरमध्ये आढळून आला आहे. या व्यक्तीचं वय ४० वर्ष असं आहे. Omicron Case In Nagpur
या ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनच्या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे आता राज्यात ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या १८ च्या वर पोहोचली आहे.
हा रूग्ण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात ओमिक्रॉनची संख्या १८ पार होती. त्य़ापैकी आता ७ जणं ओमिक्रॉन मुक्त झाले आहेत. मुंबईत चार , पुणे एक आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा एक रूग्ण आढळून आला होता. परंतु आता मुंबई, पुणेनंतर नागपूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे.
Omicron Case In Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
- kashi Vishwanath Temple Corridor Photos : आकर्षक फोटोजमधून पाहा दिव्य काशीनगरी, सोमवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते कॉरिडॉरचे लोकार्पण
- WATCH : हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
- भारतीय सैन्यातील जवानाची AK 47 या रायफलने स्वत : वर गोळी मारून आत्महत्या
- म्हाडाच्या परीक्षा रात्री उशिरा रद्द करण्यात आल्या, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारला टीका